गावाच्या परिवर्तनासाठीच आमची भूमिका – श्री पांडुरंग वग्रे
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील प्रमुख बाजारपेठे पैकी ग्रामपंचायत बांबवडे हि एक प्रमुख बाजारपेठ आहे. तालुक्याच्या आर्थिक जडणघडणीत बांबवडे हे प्रमुख व्यापार केंद्र मानले जाते. यामुळेच या गावच्या निवडणुकीसाठी संवेदनशीलता नेहमीच निर्माण झालेली असते. या गावातील एक सर्व समाजासाठी आपलं योगदान देणारे आणि कट्टर शिवसैनिक असलेले पांडुरंग वग्रे आबा हे एक चळवळीतील नेतृत्व यावेळी निवडणूक रिंगणात उतरलेलं आहे.

पांडुरंग वग्रे आबा यांनी ” बांबवडे बचाव परिवर्तन पॅनेल ” च्या माध्यमातून आपली राजकीय भूमिका आणि बांबवडे गावचा विकास या अनुषंगाने सरपंच पदासह ते निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

पांडुरंग वग्रे यांनी सुमारे २५ वर्षांपूर्वी शिवसेनेचा भगवा बांबवडे गावात रुजविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता. यामध्ये त्यांनी केवळ राजकारण न पाहता समाजकारणाला अधिक महत्व दिले होते. अनेक सामाजिक विषयांवर त्यांनी आवाज उठवला होता. त्यावेळी वाढून येणारी वीज बिले असो, कि, अनेक तासांचे लोड शेडींग असो, अशा एक न अनेक प्रश्नांवर पांडुरंग वग्रे यांनी आवाज उठवला होता. हे करीत असताना, त्यांनी केवळ राजकारण पहिले नाही, तर गावातील सामाजिक चळवळीतील अनेक मंडळींना बरोबर घेवून ते लढत होते.

यंदाच्या निवडणुकीत बांबवडे बचाव परिवर्तन पॅनेल च्या माध्यमातून गावाच्या विकासाच्या मुलभूत प्रश्नांसाठी त्यांनी आपली सरपंच पदाची उमेदवारी जाहीर केली आहे. सरपंच पदाला गरजेची असलेली त्यांची भूमिका ते या परिवर्तन पॅनेल च्या माध्यमातून भूषविणार आहेत.

यासाठी निवडणुकीचा अजेंडा त्यांच्याकडे तयार आहे. आणि यातूनच गावचा चेहरामोहरा बदलण्याचा ते प्रयत्न करणार असल्याचे एसपीएस न्यूज शी बोलताना त्यांनी सांगितले.