बांबवडे पंचक्रोशीतील भाविकांची पंढरपूर ते आळंदी पायी वारी ला २१ वर्षे पूर्ण
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी पंचक्रोशीतील भाविकांनी पंढरपूर ते आळंदी पायी वारी केली आहे. या वारीला २१ वर्षे पूर्ण होत आहेत.

पांडुरंगाच्या भेटीची ओढ प्रति वर्षी या भाविकांना लागलेली असते. कार्तिक महिना उजाडताच येथील भाविकांना पंढरपूरचे वेध लागतात. पंढरपूर मध्ये गेल्यानंतर ते पंढरपूर ते आळंदी पायी वारी करतात.तिथून ज्ञानेश्वर माउलीं च्या भेटीला हि भाविक मंडळी जातात. मुखी हरीनाम घेत आळंदी ला हि वृद्ध असो, वा तरुण मंडळी जात असतात.
या बांबवडे , सोनवडे, साळशी, आदी पंचक्रोशी तील भाविक या वारीत सहभागी होत असतात.