वालूर-जावली नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा प्रारंभ चौरे महाराज यांच्या हस्ते संपन्न
आंबा प्रतिनिधी : वालूर-जावली नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा प्रारंभ सत्य अविनाश पारखपद समाज सांप्रदाय चे सद्गुरू बबन किसन चौरे महाराज यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी येथील सरपंच सौ. वंदना पाटील, सीताराम पाटील, उपसरपंच नाना पाटील, सामाजिक कार्यकर्ते सीताराम बापू बोटांगळे , वारूळ चे उपसरपंच गोविंद सुतार, मारुती बोटांगळे, आदी प्रमुख उपस्थित होते.

जलमिशन मोहिमेंतर्गत जावली सह पिंगळे धनगरवाडा, व वालूर पाणी योजना दुरुस्ती यसाठी ९८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध आहे.

सायंकाळी सत्य अविनाश पारखपद समाजाचे सद्गुरू बालदास चौरे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त जावली येथील मठात पूजन, भजन, महाप्रसाद व शाहिरी गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सांगली चे शाहीर देवानंद माळी यांचे शाहिरी गीत संपन्न झाले.

यावेळी बंडा पाटील (निळे ), शाहीर शिवाजी पाटील ( हुंबवली), दगडू पाटील (पेरीड ), संदीप पाटील, उमेश पाटील, सर्जेराव तावरे, नामदेव पाटील, आकाराम पाटील आदी प्रमुख उपस्थित होते. चांदोली मंडळाने भजन सादर केले.