हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.
बांबवडे : हिंदू हृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज १७ नोव्हेंबर रोजी दहावा स्मृतिदिन आहे. त्यांच्या या स्मृतिदिनानिमित्त त्यांना साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने विनम्र अभिवादन.

वंदनीय बाळासाहेब ठाकरे किमान मुंबई तील तमाम मराठी माणसांचा आधारवड होते. त्यावेळी मराठी माणसांचा ते एकमेव श्वास होते. आजचं राजकारण काहीही असलं , तरी २०१२ पर्यंत , म्हणजेच त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत मुंबईतील मराठी बांधव त्यांच्या ” जय महाराष्ट्र ” या शब्दावर विसंबून असायचा. अनेकवेळा झालेल्या दंगली मध्ये मराठी माणसाला साहेब आणि त्यांच्या शिवसेनेने भगवा आधार दिला होता. हे मुंबईतील मराठी माणूस नाकारू शकत नाही.

आज ते हयात नाहीत. याचाच गैरफायदा घेत बऱ्याच मंडळींनी फितुरी केली. तसं पहायला गेलं तर, फितुरी हा महाराष्ट्राला लागलेला अभिशाप आहे. आजही तो उचंबळून आलेला आपल्याला पाहायला मिळतो. साहेबांच्या काळात त्यांचा असलेला वचक आणि शिवसेनेसोबत त्यांच्या शिवसैनिकांची त्यांच्या प्रति असलेली निष्ठा, हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिली आहे. सध्या त्यांच्या विचारांचा वारसा सांगत आम्हीच खरे बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत. हे बेगडी प्रेम फक्त सत्तेसाठी निर्माण झालेले असल्याचे आपल्याला पहायला मिळते.

भविष्यात हिंदुत्वाची धुरा बाळासाहेबांच्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आहे. अशा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना पुनश्च विनम्र अभिवादन.