छत्रपती शिवाजी महाराज , जुन्या युगासाहित आधुनिक युगाचे देखील आदर्श : समाजातून लोक चळवळ उभी राहील
बांबवडे : सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल , हे महाराष्ट्राचे आहेत कि, भाजप चे प्रवक्ते आहेत. हा प्रश्न राज्याच्या जनतेला पडला आहे. बरं नेहमी हे आमच्या राज्यातील महापुरुषांबद्दल च का बोलतात. यांना भाजप कधीच काही बोलणार नसतील ,तर राज्यातील जनताच त्यांना उत्तर देईल. महाराष्ट्राच्या सहनशीलतेचा राज्यपालांनी अंत पाहू नये.

महामहीम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कधीही महाराष्ट्राचे पालकत्व स्वीकारलेले दिसले नाही. नेहमीच महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज आणि कोणाबद्दल हि व्यक्ती काय बोलते, यांचं त्यांना भानंच रहात नाही. आणि त्यांच्या या बेताल वक्तव्याला भाजप आळा घालणार आहे कि, नाही. हा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. यासाठी लोकजागरण करायची वेळ माध्यमांवर येतेय का ? हा प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहे.

आमच्या राजांच्या अस्मितेबद्दल हि व्यक्ती एवढी उदासीन का ? बरं तुम्हाला जर आमच्या अस्मिता असलेल्या छत्रपतींबद्दल एवढाच तिटकारा असेल, तर महाशय आपण आमचे राज्य सोडून का जात नाही ? त्यांना भाजप निरोप का देत नाही ?, कि, महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान करण्याची तुम्ही सुपारीच उचलली आहे. आणि हे जर खर असलं , तर आम्हाला सुद्धा यावर प्रतिक्रिया देता येत नाही, असे कोणी समजू नये.

यावर राज्यातील सर्वच पक्षांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. भगतसिंग कोश्यारी हे अमहाराष्ट्रीयन आहेत. परंतु या राज्यातील सर्वच पक्ष महाराष्ट्रातीलच आहेत, यात शंका नसावी. इथं कोणत्याही पक्षाचं राजकारण नसून , आपल्या अस्मितेला तडा घालवण्याचं काम हि व्यक्ती वेळोवेळी करीत आहे, तरीदेखील आम्ही मात्र गप्पच. असे का ? राजे कोण एका पक्षाला आंदण दिलेले नाहीत. तर आम्हा सर्व महाराष्ट्रातल्या जनतेचं भूषण आहेत. यावर तुम्ही काही करणार नसाल, तर मात्र आम्ही लोक चळवळ उभी करू .आणि मग आपल्याला कळेल, राजे जुन्या युगाचे कि,सध्याच्या युगाचे देखील आदर्श, आणि अस्मिता आहेत.

महामहीम राज्यपाल यांनी लवकरच सुधारणा करावी, अन्यथा सध्याच्या युगातील तरुण देखील पुन्हा एकदा मावळा बनून बाहेरून आलेल्या भगतसिंग कोश्यारी यांना छत्रपती काय आहेत, ते दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत.