पाटणे इथं बांबवडे व भेडसगाव च्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी : भेडसगाव चे विद्यार्थी गंभीर जखमी
बांबवडे : बांबवडे येथील महात्मा गांधी विद्यालय व भेडसगाव येथील आनंद माध्यमिक विद्यालय यांच्या पाटणे इथं सुरु असलेल्या शालेय क्रीडा स्पर्धा मध्ये तुंबळ हाणामारी झाली असून, भेडसगाव च्या आनंद विद्यालयाचे विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान शाहुवाडी पोलीस ठाणे इथं सदर घटनेसंदर्भात शाहुवाडी पोलीस ठाणे इथं गेले असता, नव्याने रुजू झालेल्या पोलीस निरीक्षकांची भेडसगावच्या शिक्षकांना च तंबी देण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.

हि घटना शाहुवाडी तालुक्यतील बांबवडे व भेडसगाव च्या शाळांच्या विद्यार्थ्यांमध्ये पाटणे इथं घडली आहे. बांबवडे येथील रयत शिक्षण संस्थेचे महात्मा गांधी विद्यालय च्या प्रांगणात क्रीडांगण असूनही येथील उल्हाड्बाज विद्यार्थी व तरुणांमुळे हि क्रीडा स्पर्धा पाटणे इथं घेण्यात आल्याचे समजते.

बांबवडे च्या महात्मा गांधी विद्यालयाचे विद्यार्थी ओळखपत्र न घेता स्पर्धेत उतरत होते. याकाराणावरून शिक्षकांनी खेळाडूंना आक्षेप घेतला. या रागातून महात्मा गांधी विद्यालयाचे विद्यार्थी व शाळाबाह्य तरुण यांनी पाटणे इथं येवून भेडसगाव च्या विद्यार्थी खेळाडूंना उसाच्या ट्रॉलितील ऊस व काठ्यांनी मारहाण करण्यात आली. यातून थोडा प्रसाद शिक्षकांना देखील मिळाला. हि मारहाण गंभीर असल्याने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घेवून शाहुवाडी पोलीस ठाणे इथं गेले. त्यांनी दवाखान्यात दाखल करण्यासाठी पत्र देण्यास तब्बल दीड ते दोन तास शिक्षकांना बसवून ठेवले.

या घटनेत भेडसगाव च्या विद्यार्थ्यांना अधिक मार लागला असून, फ्रॅक्चर झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.


बांबवडे येथील महात्मा गांधी विद्यालय चे शिक्षक व विद्यार्थी यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. प्रती वर्षी शालेय क्रीडा स्पर्धेत हाणामारी होत असते. स्थानिक असल्याने शाळेच्या विद्यार्थ्यांचा दबदबा अधिक असल्याने, इतर शाळांना याचा फटका बसत आहे. या घटना होवू नये, म्हणून पाटणे इथं या स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. परंतु तिथे देखील बांबवडे च्या तरुणांनी आपली गावाची आब्रू काढल्याचे समजत आहे. हि माहिती घटनास्थळावरून समजते.