बांबवडे येथील दाटीवाटी च्या घराला आग : सुदैवाने जीवितहानी नाही
.
बांबवडे प्रतिनिधी : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील सरूड रोड वरील छत्रपती ताराराणी सह. पतसंस्थेच्या बाजूला असलेल्या तीन घरांमध्ये आग लागल्याने घरातील प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले आहे. घरातील सामान जळून खाक झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

बांबवडे येथील सरूड रोड ला जाणाऱ्या चौकातील ताराराणी पतसंस्थेच्या शेजारी असलेल्या सदाशिव शेळके यांच्या मालकीच्या घरात तीन कुळे भाड्याने रहात होती. यामध्ये आयेशा जहांगीर आत्तार, ,संगीता रमेश शेळके, विजय कांबळे गवंडी आणि या तिघांच्या घराला आग लागली. आगीचा धूर येवू लागल्याने मलकापूर नगरपरिषद च्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. परंतु ते येईपर्यंत या तीनही घरातील समान जळून खाक झाले होते. यामध्ये घरगुती गॅस सिलेंडर घरात असल्याने आग पसरण्याची शक्यता दाट होती. परंतु अग्निशमन दल व स्थानिक नागरिकांनी शक्य ते समान, तसेच गॅस सिलेंडर बाहेर काढले. यामुळे पुढील अनर्थ टळला.