आरपीआय च्या शाहुवाडी तालुका अध्यक्ष पदी चंदर कांबळे तर उपाध्यक्षपदी प्रकश माने यांची निवड
बांबवडे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोल्हापूर च्यावतीने शाहुवाडी तालुक्याच्या अध्यक्ष पदी चंदर महिपती कांबळे यांची तर उपाध्यक्ष पदी प्रकाश मधुकर माने यांची निवड करण्यात आली आहे. तशा आशयाचे पत्र त्यांना पक्षाच्या वतीने देण्यात आले आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन.

चंदर महिपती कांबळे हे सांबू गावचे रहिवाशी आहेत. त्यांची सामाजिक कार्याची ओढ आणि धडपड पाहता त्यांना हे अध्यक्ष पद देण्यात आले आहे.

तसेच प्रकाश मधुकर माने हे सरूड गावचे रहिवाशी असून, त्यांना देखील सामाजिक कार्याची ओढ आहे. याच अनुषंगाने त्यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

सदर निवडी चे पत्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पांडुरंग नामदेव कांबळे ( कुरुकलीकर ), व जिल्हा सरचिटणीस भीमराव दौलत कांबळे या मान्यवरांच्या स्वाक्षरी ने देण्यात आले आहे.