क्षयरुग्णांनी वेळेवर औषधोपचार केल्यास तो लवकर बरा होतो- श्री हंबीरराव पाटील बापू
भेडसगाव प्रतिनिधी : क्षय रुग्णाने वेळेत उपचार व योग्य पोषण आहार घेतल्यास बरा होतो. तेंव्हा अशा रुग्णांनी घाबरून न जाता, न लाजता उपचार करून घ्यावे, असे आवाहन माजी बांधकाम व आरोग्य सभापती हंबीरराव पाटील ( बापू ) यांनी केले आहे.

यावेळी त्यांच्या भेडसगाव नागरी सह. पतसंस्थेने, भेडसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या क्षेत्रातील चार क्षयरुग्णांना पोषण आहारासाठी दत्तक घेतले आहे. अशी माहिती यावेळी हंबीरराव पाटील यांनी दिली.

राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत क्षयरुग्ण पोषण आहार हि एक सामाजिक बांधिलकी आहे. या संकल्पनेतून कोल्हापूर जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर , जिल्हा क्षयरोग अधिकारी श्रीमती डॉ. कुंभार मॅडम, शाहुवाडी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एच.आर.निरंकारी यांनी केलेल्या आवाहनानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र भेडसगाव कार्यक्षेत्रातील चार क्षयरुग्णांना श्री. हंबीरराव पाटील यांनी भेडसगाव नागरी सह.पतसंस्थेच्या माध्यमातून पोषण आहारासाठी दत्तक घेतले आहे. हा कार्यक्रम भेडसगाव तालुका शाहुवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात संपन्न झाला.

यावेळी बोलताना श्री हंबीरराव पाटील बापू पुढे म्हणाले कि, एखाद्या व्यक्तीला क्षयरोगाची लागण झाल्यास त्यांची तब्येत ढासळते. त्यांनी वेळेवर औषधोपचार केल्यानंतर योग्य सकस पोषण आहाराची गरज भासते. या रुग्णांनी वेळेत औषधे घेतल्यास, पोषण आहार घेतल्यास, क्षयरोगाचा प्रसार कमी होवू शकतो. तेंव्हा अशा रुग्णांनी वेळेवर उपचार करून घ्यावेत, असे आवाहन देखील श्री हंबीरराव पाटील यांनी केले.

सदर च्या कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी श्रीमती डॉ. श्रेया मॅडम, श्री.संजय शिकवणे ( एस.टी.एस.), बबन झोकांडे ( एस.टी.एल.एस.), ए.एस.महिंद, एम.बी.यादव ( आरोग्य सहाय्यक ), श्री.सुभाष यादव तालुका सुपरवायझर, भेडसगाव नागरी पतसंस्थेचे व्यवस्थापक श्री संजय पाटील, तसेच भेडसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते.