तालुक्याच्या क्षेत्रात ” डिजिटल शाळेचे ” अभिनव पाऊल : यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अॅकॅडमी अँड ज्युनिअर कॉलेज
बांबवडे : डोणोली तालुका शाहुवाडी येथील यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अॅकॅडमी अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये अवघी शाळा डिजीटल करण्यात आली आहे. तालुक्याच्या दृष्टीने हि सगळ्यात मोठी आणि आनंदाची बाब आहे. या शाळेच्या अभिनव उपक्रमामुळे आपली भावी पिढी अधिक वेगवान झाल्याशिवाय राहणार नाही. या अभिनव उपक्रमाचा उद्या दि.२४ नोव्हेंबर रोजी सकळी ११.०० उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे. त्यांच्या या अभिनव उपक्रमाला साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.

शाहुवाडी तालुक्यातील संपूर्ण शाळा डिजिटल करण्याचा अभिनव उपक्रम प्रथम च संपन्न होत आहे. शाळेचे सर्वेसर्वा डॉ. जयंत पाटील यांचा उद्या २४ नोव्हेंबर २०२२ रोजी वाढदिवस संपन्न होत आहे. आणि याचदिवशी या उपक्रमाचा शुभारंभ करण्याचे प्रयोजन शाळेचे प्राचार्य श्री सचिन जद सर यांनी केले आहे.

शाळा डिजिटल करणे म्हणजे शाळेच्या प्रत्येक वर्गात टीव्ही असणार आहे. याचा उपयोग विद्यार्थ्यांना भौतिक जगाची माहिती मिळावी. तसेच अनेक गोष्टी इंटरनेट च्या माध्यमातून समजाव्यात. आणि आपली भावी पिढी शैक्षणिक दृष्ट्या सुदृढ व्हावी, हा उद्देश शाळा डिजिटल करण्यामागे आहे.

त्यांच्या या शैक्षणिक क्षेत्रातील नव्या पावलाचे शाहुवाडी तालुक्यातून निश्चितच स्वागतच करण्यात येईल. पुनश्च त्यांच्या या नव्या उपक्रमाला एसपीएस न्यूज च्या वतीने हार्दिक शुभेच्छा.