हिंदुत्वाचा भगवा खांद्यावर पेलणारे नामदेव गिरी यांना वाढदिवसानिमित्त भगव्या शुभेच्छा
बांबवडे : शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख श्री नामदेव गिरी यांचा आज वाढदिवस. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांना साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. याचबरोबर तालुक्यातील शिवसैनिकांच्या वतीने तालुका उपप्रमुख विजय लाटकर यांनी देखील त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त भगव्या शुभेच्छा दिल्या आहेत.

श्री नामदेव गिरी आज शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख या पदावर काम करीत आहेत. परंतु ते वयाच्या १५ व्या वर्षापासून शिवसेनेचा, पर्यायाने हिंदुत्वाचा भगवा खांद्यावर घेवून चालत होते. त्यावेळी त्यांच्या मनात देखील नसेल कि, ते या पदावर जातील. परंतु खांद्यावर भगवा आणि मनात ” बाळासाहेब ” ह्या नेतृत्वाविषयी असलेले अलोट प्रेम, या गोष्टीच त्यांना या पदापर्यंत घेवून गेल्या आहेत.

त्यावेळी देखील तालुक्यातून होणाऱ्या शिवसेनेच्या अनेक आंदोलनात नामदेव गिरी, त्यांचे थोरले बंधू सुखदेव गिरी हे दोन्ही भाऊ स्वत:ला शिसेनेच्या आंदोलनात झोकून द्यायचे. अनेक वेळा विजेच्या लोड शेडींग प्रकरणी रस्ता रोको, सारखी आंदोलने त्यांनी गाजवली होती.

शिवसेनेवर मनापासून प्रेम करणाऱ्या,आणि स्वत:ला भगव्याच्या चरणी झोकून देणाऱ्या या युवकाला, अखिल भारतीय मराठा संघाचे पदाधिकारी आणि मुळचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल शालेय वयापासून अतीव प्रेम असणारे गोगवे पैकी तळपवाडी येथील शाहीर अनिल पाटील यांनी देखील नामदेव गिरी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.