बांबवडे च्या निवडणुकीत श्री महादेव आघाडी ला च भरघोस मतांनी विजयी करा- श्री मानसिंगराव गायकवाड दादा
बांबवडे : बांबवडे ग्रामपंचायत २०२२ च्या निवडणुकीत श्री महादेव ग्रामविकास आघाडी चे सरपंच पदाचे अधिकृत उमेदवार श्री भगतसिंग तानाजीराव चौगुले, हे असून याच आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणावे, असे आवाहन श्री मानसिंगराव गायकवाड दादा यांनी बांबवडे ग्रामस्थांना केले आहे. एसपीएस न्यूज शी बोलताना त्यांनी हि माहिती दिली
.
ते पुढे म्हणाले कि, सध्या तालुक्यात ४९ ग्रामपंचायत च्या निवडणुका लागल्या आहेत. तेंव्हा आमच्या फोटो चा वापर करून, अनेक मंडळी सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. दरम्यान बांबवडे गावची निवडणूक हि प्रतिष्ठेची आहे. इथं स्थानिक पातळीवर झालेल्या युतीमध्ये आमच्या सोबत माजी आमदार सत्यजित पाटील आबा, त्याचबरोबर अशोकराव घोडे- पाटील यांचे चिरंजीव स्वप्नील घोडे- पाटील यांचे जनसुराज्य शक्ती पक्षाचे वरिष्ठ नेते आमदार डॉ. विनय कोरे, याचबरोबर स्व. आमदार संजय दादा गटाचे नेतृत्व करीत असलेले कर्णसिंह गायकवाड गटा चे कार्यकर्ते यांची स्थानिक पातळीवर युती करण्यात आली आहे. तेंव्हा आपले सरपंच पदाचे अधिकृत उमेदवार भगतसिंग चौगुले आहेत.
याच पातळीवर बांबवडे गावची निवडणूक लढविण्यात येत आहे. तेंव्हा श्री महादेव ग्रामविकास आघाडी चे प्रमुख अभयसिंग चौगुले यांच्या नेतृत्वाखाली हि निवडणूक लढविली जात आहे. तेंव्हा या आघाडीला ग्रामस्थ भरघोस मतांनी निवडून देतील,यात शंका नाही. असेही श्री मानसिंगराव गायकवाड दादा यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.