मा. आमदार श्री सत्यजित पाटील सरुडकर आबा यांना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
बांबवडे : शाहुवाडी-पन्हाळा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार श्री सत्यजित पाटील सरुडकर आबा यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा .

आज २६ नोव्हेंबर २०२२ आज माजी आमदार सत्यजित आबा यांचा वाढदिवस. यानिमित्त त्यांच्या कार्य कर्तुत्वावर टाकलेला एक कवडसा.

सत्यजित आबा यांची राजकीय सुरुवात जिल्हा परिषद सदस्य या पदापासून झाली. ” मामा ना सांगा, भाचा निवडून आला. ” या वाक्यावरून अवघा भेडसगाव जिल्हा परिषद मतदार संघ दणाणून गेला होता. त्यावेळी या युवकाने आपल्या कार्य कुशलतेने कार्यकर्ता गोळा केला. मतदारसंघासह त्यांनी विधानसभा मतदारसंघ सुद्धा पिंजून काढला. नवीन कार्यकर्ता तयार केला. त्यांना पाठबळ दिले.

आबांचे वडील श्री बाबासाहेब पाटील सरुडकर दादा यांच्यासहित त्यांनी स्वत:चा कार्यकर्ता तयार केला. आणि त्यावेळी श्री बाबासाहेब पाटील सरुडकर दादा यांनी त्यांना पाठबळ देवून विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी कार्यकर्त्यांना विचारून दिली. तिथून हि गाडी जोरात सुरु झाली. त्यानंतर त्यांनी केलेला शिवसेना प्रवेश आणि खांद्यावर घेतलेला भगवा आजही तितक्याच डौलाने फडकत आहे.

अशा या कुशल नेतृत्वाला त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुनश्च शुभेच्छा.