अभिनव शिक्षणाचे नवे संकुल : यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अॅकॅडमी अँड ज्युनिअर कॉलेज डोणोली
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील डोणोली येथील यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अॅकॅडमी अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये संस्थेचे सचिव डॉ. जयंत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यात पहिली शाळा डिजिटल करून शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे अभिनव पाऊल टाकले आहे. त्याचबरोबर खुटाळवाडी येथील नव्याने सुरु होत असलेल्या हॉस्पिटल मध्ये मोफत आरोग्य शिबीर व रक्तदान शिबीर संपन्न झाले.

यावेळी बोलताना डॉ. जयंत पाटील म्हणाले कि, दिवंगत माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील व संस्थेचे माजी व्यवस्थापक दिवंगत प्रदीप पाटील (बाबा ), यांचे स्वप्न होते, कि, उच्च शिक्षण हे डोंगरी तालुक्यात तळागाळापर्यंत पोहोचावे. आणि त्या दृष्टीने आमचे यशस्वी प्रयत्न सुरु आहेत. आणि लवकरच ते पूर्णत्वास नेवू, असेही डॉ. जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

तसेच संस्थेच्या अध्यक्षा पद्मजा पाटील , व विश्वस्त विनिता पाटील यांनी संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ कोडोली, चे सचिव डॉ. जयंत पाटील यांच्या हस्ते डिजिटल शाळेचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी माजी गटशिक्षणाधिकारी नंदकुमार शेळके म्हणाले कि, एवढ्या मोठ्या प्रमाणात शाळेच्या प्रत्येक वर्गात डिजिटल संगणक प्रणालीद्वारे शिक्षण मिळणारी तालुक्यातील हि एकमेव संस्था असून, त्याचा लाभ विद्यार्थ्यांना होईल, यात शंकाच नाही.

यावेळी डोणोली येथील संस्थेचे प्राचार्य श्री सचिन जद सर यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला.

कार्यक्रमास डोणोली चे सरपंच पंडितराव शेळके, यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध शाखांमधून आलेले शाखाप्रमुख सर्वश्री विश्वनाथ पाटील, झेंडे, आर.आर. पाटील, ग्रेस गायकवाड मॅडम, अनिश पनेकर,तसेच अनेक मान्यवर यांच्यासहित शाहुवाडी आणि पन्हाळा पंचक्रोशीतील ग्रामस्थ विद्यार्थी विद्यार्थिनी देखील उपस्थित होते.