राजकीयसामाजिक

जनतेच्या आशीर्वादांना विकासाचे बळ मिळेल – श्री महादेव ग्रामविकास आघाडी


बांबवडे प्रतिनिधी : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील ग्रामपंचायत निवडणूक लागली असून, श्री महादेव ग्राम विकास आघाडी चे उमेदवार श्री भगतसिंग चौगुले हे सरपंच पदासाठी निवडणूक रिंगणात उतरत आहेत. त्यांच्यासहित संपूर्ण पॅनेल चा गाडा चालविण्यासाठी वरिष्ठ नेते मानसिंगराव गायकवाड दादा, माजी आमदार श्री सत्यजित पाटील सरुडकर आबा, तसेच जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेतृत्व असलेले स्व. अशोकराव घोडे-पाटील यांचे चिरंजीव स्वप्नील घोडे-पाटील आणि त्यांचे सहकारी व त्यांचे वरिष्ठ नेते विद्यमान आमदार डॉ. विनयरावजी कोरे, व येथील पारंपारिक नेतृत्व असलेले स्व. संजय दादा यांचे सुपुत्र कर्णसिंह गायकवाड सरकार आणि त्यांचे सहकारी यांच्या आशीर्वादाने हि आघाडी निवडणूक रिंगणात उतरत आहे. जनतेच्या आशिर्वादांना विकासाचे बळ मिळेल, असा मानस ग्रामपंचायत सदस्य व श्री महादेव ग्राम विकास आघाडी चे प्रमुख श्री अभयसिंह चौगुले यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना व्यक्त केला.


यावेळी श्री चौगुले पुढे म्हणाले कि, २०२२ ची निवडणूक जवळजवळ बांबवडे गावाच्या सगळ्याच तरुण, वृद्ध मंडळींना सोबत घेवून पुढे जाण्याची आघाडी ची भूमिका आहे. या आघाडीमध्ये सर्वांना विचारून सर्वंकष निर्णय घेतले जात आहेत. यंदाच्या निवडणुकीत तरुण वर्गाला संधी देण्याचा आमचा प्रयत्न राहील.


केवळ एकमुखी कारभार न ठेवता, सर्वसमावेशक कारभार राबविण्याचा आमचा माणस आहे. यामध्ये ग्रामस्थ, व्यापारी, तरुण मंडळे, विद्यार्थी, विशेषकरून गावातील शेतकरी बांधव अशा प्रत्येकासाठी स्थान असणार आहे. तेंव्हा प्रत्येक ग्रामस्थ, नागरिक, व्यापारी या सर्वांनीच आपले आशीर्वाद या आघाडीसोबत ठेवल्यास भविष्यात चांगले दिवस दूर राहणार नाहीत. गावचा विकास पाहण्यासाठी दुसऱ्यांच्या गावी न जाता,तो आपल्या गावात कसा होईल ? याकडे आमचे लक्ष असणार आहे. यासाठी तुमच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे. एकदा या आघाडी ला संधी देवून पहा, तुम्हाला तक्रारीसाठी आम्ही जागा ठेवणार नाही. हा आमचा शब्द आहे.


यंदाची आघाडी नेहमीच केल्या जाणाऱ्या चर्चांवर आधारित नसून, खऱ्या अर्थाने गावचा चेहरामोहरा बदलण्याचा केला जाणारा सर्व समावेशक कार्यक्रम आहे. केवळ दुसऱ्यांना अडचणीत कसे आणता येईल, असे न करता सगळ्यांना बरोबर कसे नेता येईल याकडे आमचे लक्ष असणार आहे. यामध्ये गावाच्या विकासावर निश्चितच लक्ष राहील , परंतु याचबरोबर गावचे राजकारण शुद्ध करण्याचा देखील हा एक प्रयत्न आहे. यासाठी तरुण वर्गाला तसेच नवोदितांना दिलेली हि संधी आहे.
यामध्ये सरपंच पदाचे उमेदवार श्री भगतसिंग चौगुले असून, त्यांनी तरुणवर्गाकडून गावाच्या हिताच्या सूचना काही असतील तर करा, अशी भूमिका घेतली आहे. याचबरोबर त्यांचा स्वत:चा एक अजेंडा त्यांनी तयार केला आहे. आज गावात मुबलक पाणी असताना हि, आयाबहिणींची होणारी पाण्यासाठी धडपड निश्चितच विचार करायला लावणारी आहे. तरुण वर्गासाठी स्पर्धापरीक्षा केंद्र, त्याचबरोबर सर्वांच्या आरोग्याला गरजेचा असणारा व्यायाम, तोःहि मोफत व्हावा, यासाठी आऊट डोअर जीम ची व्यवस्था गरजेची आहे. अशा अनेक सुविधा गावासाठी आखणी करण्यात आल्या आहेत.
तेंव्हा आपला आशीर्वाद हीच आमची प्रेरणा असेल,

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!