अपक्ष उमेदवार शिवसेनेचे विजय लाटकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत अपक्षांची भूमिका देखील निर्णायक ठरणार आहे. येथील प्रभाग क्र. एक मधील विजय कुमार लाटकर हे शिवसेनेचे पदाधिकारी असून त्यांनी देखील या निवडणुकीत आपल्या सहकाऱ्यांसह नामनिर्देशन अर्ज दाखल केला आहे.

या निवडणुकीत सध्याच्या घडीला तीन पॅनेल उभे राहिले असून, यांच्यासहित अपक्ष सुद्धा आहेत. विजय लाटकर हे केवळ भगवा खांद्यावर घेवून निवडणुकीत उभे आहेत. प्रत्येकजण या निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत. इथं भगवा ध्वज खांद्यावर असलेले विजय लाटकर यांनी मात्र आपली उमेदवारी स्वतंत्र जाहीर केली आहे. अद्याप ते कोणत्याही पॅनेल मध्ये सामील झाले नसले, तरी शिवसेनेच्या चळवळींच्या माध्यमातून ते अनेकवेळा जनतेसमोर आले आहेत. भविष्यात हि उमेदवारी मतांची निर्णायक बेरीज ठरू शकते.

यासाठी विजय लाटकर एक महिला उमेदवार देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरवत आहेत. याची दखल मात्र स्पर्धेत असलेल्या उमेदवारांना घेणे अनिवार्य ठरणार आहे.