बांबवडे बचाव परिवर्तन पॅनेल चे सहा उमेदवारी अर्ज दाखल
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील ” बांबवडे बचाव परिवर्तन पॅनेल ” च्या वतीने २९ नोव्हेंबर २०२२ रोजी एकूण सहा नामनिर्देशन अर्ज शाहुवाडी तहसीलदार कार्यालय इथं दाखल करण्यात आले आहेत. या अनुषंगाने बांबवडे बचाव परिवर्तन पॅनेल ने निवडणुकीचे रणशिंग खऱ्या अर्थाने फुंकले आहे.

या बांबवडे बचाव परिवर्तन पॅनेल चे सरपंच पदाचे उमेदवार पॅनेलप्रमुख खुद्द पांडुरंग हरिबा वग्रे ( आबा ) यांनी देखील आपल्या उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे. ” आबा ” हे व्यक्तिमत्व चळवळीचे व्यक्तिमत्व आहे. यांनी अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेवून, सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरलेले व्यक्तिमत्व आहे. हि त्यांच्यादृष्टीने जमेची बाजू आहे.

गेल्या दहा वर्षात गावात सुरु असलेल्या कारभारामध्ये खऱ्या अर्थाने बदल किंवा सुधारणा करणे, हि काळाची गरज आहे. यासाठी पांडुरंग वग्रे हे व्यक्तिमत्व आपल्या सहकाऱ्यांसहित निवडणुकीला सामोरे जात आहे.

त्यांच्या पॅनेल मध्ये प्रभाग क्र.एक मध्ये सर्वसाधारण पुरुष गटामध्ये श्री सचिन महादेव मूडशिंगकर , येथील सर्वसाधारण स्त्री राखीव येथून कु. शेफाली सुरेश म्हाऊटकर, व येथील अनुसूचित जाती स्त्री राखीव मधून श्रीमती पार्वती उर्फ केराबाई शिवाजी खैरे .तसेच प्रभाग क्र.तीन मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग मधून कु. दिग्विजय संजय पाटील यांचे अर्ज दाखल केले आहेत.