जागतिक एड्स दिन निमित्त मलकापूर मध्ये जनजागृती रॅली संपन्न : ग्रामीण रुग्णालय व प्रा.डॉ. एन.डी. पाटील महाविद्यालय पेरीड यांचा सहभाग
मलकापूर प्रतिनिधी ( रोहित पास्ते ) : १ डिसेंबर हा ” “जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. या एड्स दिनाचे औचित्य साधून ग्रामीण रुग्णालय व प्रा.डॉ. एन.डी. पाटील महाविद्यालय पेरीड यांच्या संयुक्त विद्यमाने मलकापूर शहरातून रॅली काढण्यात आली.
दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस ” जागतिक एड्स दिन ” म्हणून पाळला जातो. जगभर पसरलेल्या ‘ एड्स ‘ या जीवघेण्या रोगाबद्दल जनजागृती व्हावी, आणि या रोगामुळे मरण पावलेल्यांप्रती शोक व्यक्त करण्यासाठी हा दिवस पाळला जावा, असे संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केले आहे. शासकीय, अशासकीय संस्था, आणि आरोग्य अधिकारी, आणि जगभरातील जनता, एड्स प्रतिबंध आणि नियंत्रणावरील शिक्षणासह हा दिवस संपन्न करण्यात येतो.
२०१७ पर्यंत ‘ एड्स ‘ मुळे जगभरात २.८९ ते ४१.५ कोटी लोकांचा मृत्यू झाला आहे. अंदाजे ३.६७ कोटी लोक एच.आय.व्ही. सह जगत आहेत. ज्यामुळे हे अभिलीखीत इतिहासातील सर्वात महत्वाच्या जागतिक सार्वजनिक आरोग्य समस्यांपैकी एक आहे.
यावेळी विद्यार्थ्यांच्या हातात असणाऱ्या फलकावर एड्स विषयी लोकांमध्ये जनजागृती आणू या, एच.आय.व्ही. विरहित आयुष्य जगू या. अशा आशयांच्या घोषणा होत्या.
मलकापूर ग्रामीण रुग्णालय आयसीटीसी. विभाग व प्रा.डॉ. एन.डी. पाटील महाविद्यालय प्राणीशास्त्र विभाग, एनएसएस विभाग, व रेड रिबन क्लब व महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्यामार्फत जनजागृती रॅली चे आयोजन करण्यात आले.