लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यालय चिखली मध्ये भरला ” आठवडा बाजार “
शिराळा प्रतिनिधी : शिराळा तालुक्यातील लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यालय चिखली मध्ये ” आठवडा बाजार ” चा उपक्रम विद्यार्थी आणि शिक्षकांनी सादर केला. यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता.

दैनंदिन जीवनातील आर्थिक घडामोड विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रीत्त्या कळावी, यासाठी भाजी विक्रेते आणि ग्राहक असा आठवडा बाजार साकार करण्यात आला. यामध्ये भाजी विक्रेते विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या भूमिकेत होते. तर ग्राहक सुद्धा विद्यार्थी च होते.

या उपक्रमातून पैशाची देवाण-घेवाण यांची कल्पना विद्यार्थ्यांना देण्यात आली. वस्तू चा खरेदी दर यापेक्षा विक्रीचा दर अधिक केल्याशिवाय नफा मिळत नाही. याची कल्पना विद्यार्थ्यांना देण्यात आली. यावरून खरेदीच्या दरापेक्षा विक्रीचा दर अधिक असतो, हे विद्यार्थ्यांना कळले.

यामध्ये भाजीपाला व विविध प्रकारचे स्टॉल्स लावण्यात आले होते. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष रोहीतजी नाईक (भैय्या ) यांनी ” आठवडा बाजार ” उपक्रमास भेट दिली. दरम्यान सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक श्री नाईक यांनी केले.

यासाठी मुख्याध्यापक धनराज गवळी सर, यांच्यासहित इतर शिक्षकांनी देखील परिश्रम .