गुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा
बांबवडे : युनिक ऑटोमोबाईल्स कोल्हापूर व गुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे तालुका शाहुवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ७ व ८ डिसेंबर २०२२ रोजी बांबवडे इथं भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात दुचाकी वाहन बुकिंग करणाऱ्या ग्राहकांस एक आकर्षक भेट वस्तू, व ५ लिटर पेट्रोल फ्री देण्यात येणार आहे, अशी माहिती गुरुनाथ ऑटोमोबाईल्स चे मालक श्री श्रीकांत सिंघण यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.

यावेळी श्री सिंघण माहिती देताना पुढे म्हणाले कि, या मेळाव्याची काही खास वैशिष्ठ्ये आहेत.
कमीत कमी डाऊनपेमेंट मध्ये तुम्ही दुचाकी खरेदी करू शकता. वाहन खरेदी करिता तुम्हाला विविध पर्यायांसाहित फायनान्स उपलब्ध करण्यात येत आहे. सुलभ हफ्त्यांवर तुम्ही वाहन खरेदी करू शकता.

तसेच सर्व मॉडेल्स च्या दुचाकी विविध रंगांमध्ये हजर स्टॉक मध्ये उपलब्ध आहेत. इथं केवळ दुचाकी वाहनांची विक्री च करण्यात येत नाही तर, विक्री पश्चात सेवा देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. यासाठी ५ वर्षे अनुभव असलेले तीन मेकॅनिक आपल्या वाहनांच्या देखभालीसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे सर्व प्रकारच्या जुन्या अथवा नव्या गाड्यांमध्ये काही दुरुस्ती असल्यास,तो बिघाड बांबवडे इथंच दूर करण्यात येईल. त्यासाठी तुम्हाला कोल्हापूर ला जाण्याची काही आवश्यकता नाही. कारण इथं BS 6 गाड्यांचे कॉम्प्यूटर चेक अप सॉफ्टवेअर व टूल्स उपलब्ध असल्याने सर्व गाड्यांचे चेक अप इथंच करून मिळेल.

हिरो कंपनी कडून प्रत्येक गाडीची वॉरंटी ५ वर्षे देण्यात आली असून, प्रत्येक गाडीची ५ वेळा फ्री सर्विसिंग करून देण्यात येईल. तसेच प्रत्येक ३००० कि.मी.नंतर पेड सर्विसिंग इथंच करून मिळेल.

त्यामुळे अशा सुवर्ण संधीचा लाभ ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन गुरुनाथ ऑटोमोबाईल्स चे मालक श्री श्रीकांत सिंघण यांनी ग्राहकांना केले आहे. अधिक माहिती साठी पुढील क्र. ९४२३२८२९१५ , ९७६३७२७१५१ वर संपर्क साधावा, असे आवाहन देखील आयोजकांकडून करण्यात आले आहे.