बांबवडे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सुमारे ५३ अर्ज दाखल
बांबवडे : श्री महादेव ग्रामविकास आघाडी च्या अनेक उमेदवारांनी केडीसी बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड यांच्या उपस्थितीत नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. बांबवडे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदासह एकूण ५३ अर्ज दाखल झाले आहेत.

सरपंच पदासाठी श्री महादेव ग्रामविकास आघाडी चे श्री भगतसिंग चौगुले, श्री महादेव ग्रामविकास पॅनेल चे सरपंच पदाचे उमेदवार श्री युवराज यादव शिराळकर, तर बांबवडे बचाव परिवर्तन पॅनेल चे सरपंच पदाचे उमेदवार पांडुरंग वग्रे (आबा) हे आहेत.याशिवाय अपक्ष उमेदवार श्री दिग्विजय संजय पाटील, हे सुद्धा निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
श्री महादेव ग्रामविकास पॅनेल चे नेतृत्व माजी सरपंच विष्णू यादव शिराळकर व सयाजी निकम करीत आहेत. या पॅनेल च्या पाठीशी कर्णसिंह गायकवाड, हे खंबीरपणे आहेत. तसेच मानसिंगराव गायकवाड दादा, तसेच आमदार डॉ.विनय कोरे यांचे फोटो सुद्धा या श्री महादेव ग्रामविकास पॅनेल च्या जाहिरातीवर झळकताना दिसत आहेत.

श्री महादेव ग्रामविकास आघाडी सुद्धा या निवडणुकीत सगळ्यांना एकत्र घेवून लढत आहेत. यामध्ये मानसिंगराव गायकवाड दादा, कर्णसिंह गायकवाड सरकार, माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर गट, तसेच विद्यमान आमदार डॉ. विनय कोरे यांचा जनसुराज्य शक्ती पक्ष सुद्धा या आघाडीत सामील झाला आहे.

या आघाडी चे नेतृत्व जुने जाणते माजी सरपंच जयसिंगराव घोडे-पाटील, भगवान निकम (आप्पा), विलास निकम, सुभाष पाटील (आप्पा ), पंडितराव निकम, बाळासाहेब पाटील, सुनील वाणी, अशोक विठ्ठल निकम, विजय पाटील, दिलीप बंडगर, शामराव कांबळे, शशिकांत श्रीपती कांबळे, सदाशिव निवृत्ती कांबळे, आदी मंडळी या आघाडी ला मदत करीत आहेत.

बांबवडे बचाव परिवर्तन पॅनेल सुद्धा चळवळीच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीत उतरले आहे. याचे नेतृत्व शिवसेनेचे माजी पदाधिकारी पांडुरंग हरिबा वग्रे आणि त्यांचे सहकारी करीत आहेत. यांनी आपले स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. यांच्यासहित अपक्ष उमेदवार सुद्धा या निवडणुकीत आपले नशीब अजमावत आहेत.
एकंदरीत बांबवडे गावाच्या विकासासाठी तिन्ही पॅनेल पुढे आले आहेत.