विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापारीनिर्वांदिना निमित्त विनम्र अभिवादन
बांबवडे : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापारीनिर्वांदिना निमित्त त्यांना साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने विनम्र अभिवादन.

संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संघर्षाची प्रेरणा दिली. माणसाला माणसाशी माणसासारखे वागण्याची संस्कृती दाखवून दिली. शिका, संघटीत व्हा, आणि संघर्ष करा. असे बहुमुल्य ज्ञान समाजाला दिले. गावकुसाबाहेर ठेवलेल्या समाजाला स्वाभिमानाने जगण्यासाठी प्रेरणा दिली. आणि अवघा समाज एक केला. समता, बंधुता, आणि स्वाभिमान ज्या अवलिया व्यक्तिमत्वाने समाजाला शिकवले, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खऱ्या अर्थाने तळागाळातील नागरिकाला सर्व हक्क संविधानाच्या माध्यमातून समाजाला मिळवून दिले.

अशा महामानवाला पुनश्च आदरांजली.