विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापारीनिर्वान दिनानिमित्त तालुकावासियांकडून आदरांजली
शाहुवाडी प्रतिनिधी : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरीनिर्वान दिनानिमित्त शाहुवाडी पंचायत समिती शाहुवाडी येथील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना अर्पित करण्यात आली. यावेळी तालुक्यातील तमाम आंबेडकर प्रेमी अनुयायांनी मानवंदना अर्पण केली.

यावेळी प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी यांनी देखील आपली उपस्थिती दर्शविली होती.

यावेळी सीताई उद्योग समूह चे चेअरमन आनंदराव कामत, प्रकाश कांबळे करूंगळेकर , अॅड. विक्रमसिंह बांबवडेकर, यांच्यासहित तमाम जनतेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पित केली.