आयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार
बांबवडे : असावं घरटं आपलं छानं. आपलं एक छोटंसं घर असावं, त्यात आपले आई-वडील असावेत,
पत्नी आणि मुलांसहित तिथं शांतता, आणि समाधान असावं. एवढीच छोटीशी इच्छा माणसानं आपल्या मनात बाळगली, तर सुख नक्की तिथेच आपल्याला सापडेल. फक्त पैसा, गाडी, बंगला, आणि ऐश्वर्य अशी इच्छा करीत गेलो, कि आपल्याला मोह सुटतो. त्यातून आकांक्षा वाढतात, आणि पुन्हा तिथे अहंकाराचा जन्म होतो.
या सगळ्यांपेक्षा कुटुंब छोटं असावं, जीवापाड प्रेम करणारे नातेवाईक असावेत. आणि त्याहीपेक्षा जिवापलीकडे आपल्याला जपणारी आपली मैत्री असावी. मैत्री सुद्धा निरपेक्ष असावी. कि आज मला जि लाभत आहे.
आज ज्या माझ्या मित्रांनी, आप्तेष्टांनी राजकारण विसरून सर्व पेशातील मित्रांनी मला शुभेच्छा दिल्या, त्या माझ्यासाठी लाख मोलाच्या आहेत. त्या शुभेच्छांचा परतावा, निश्चित या आयुष्यात मी माझ्या सत्कर्माच्या माध्यमातून करीत राहण्याचा प्रयत्न करेन.
आज माझी पत्नी ,जिने मला माझ्या आयुष्यात प्रत्येकवेळी मोलाची न सुटणारी साथ दिली. आज मी जो काही आहे, तो तिच्या साथीवर आहे. हे विसरता येणार नाही. माझा मुलगा ओंकार, माझी मुलगी म्हणजे आमच्या सगळ्यांचं आमच्यावर जीवापाड प्रेम करणारं पिल्लू , त्याचबरोबर माझी मुलगी सासरी गेल्यावर तिची कमतरता मला भासू नये, अशी माझ्यावर वडिलांवर प्रेम करणारी आमची सुनबाई सौ भाग्यश्री , म्हणजे आमची दुसरी मुलगी. आमचा एक पुतण्या आहे. अमोल व त्यची पत्नी तृप्ती त्या पवार घराण्याच्या पहिल्या सुनबाई. या सगळ्यांनी मला सांभाळला आहे.
त्यांचे प्रेम किती असावं, तर त्याला माप नसावं .
नशिबानं किती द्यावं, तर त्याला मोल नसावं,
दोन्ही हातांनी किती घ्यावं, तर मनापेक्षा अधिक नसावं.
आयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं…
नवीन येणारे जावई ” संदेश ” या नव्या नात्याने पुन्हा एकदा नात्यांचा नवा गुच्छ तयार झाला आहे. असा माझा संसार आहे. आणि परमेश्वराने माझ्यावर केलेले हे प्रेम आहे. त्यांची किंमत होवू शकत नाही.
पुनश्च माझ्या हितचिंतकांना आभार. त्यांच्या ऋणात राहाणं मला आवडेल.