शेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…
बांबवडे : शेतकरी हा सगळ्या जगाचा अन्नदाता आहे. तरीसुद्धा तो उपेक्षित आहे. आज जग आधुनिकतेच्या जगात कितीही प्रगती करीत असले, तरी जगण्यासाठी अन्नाची गरज असते. ती गरज फक्त शेतकरी च पूर्ण करतो.

अशा शेतकरी बांधवांना जमेल तेंव्हा त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करावा. त्याच्या आयुष्याला तेवढीच मदत. आणखी आपल्या ऊस वाहतूकदारांना एक विनंती आहे. शेतकरी आपला ऊस किती कष्टातून पिकवतो. त्यासाठी किती खते, औषधे, वापरून आपला ऊस जगवतो, पर्यायाने वाढवतो. यासाठी हजारो रुपये खर्च होतात, आणि त्याव्यतिरिक्त त्याचे कष्ट हे वेगळेच राहतात.

त्या ऊसापोटी येणाऱ्या बिलांवर शेतकऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबांची स्वप्ने रंगलेली असतात. पण कधी चुकून हा ऊस कारखान्यात जाण्या अगोदर रस्त्यावरच थांबतो. त्यांच्या ऊसाचे वजन उन्हामुळे कमी होते. आणि सरते शेवटी त्याच्या हातात येणारी बिलापोटी रक्कम तुटपुंजी च ठरते. यासाठी आपण वाहतूकदार मंडळींनी शेतकऱ्याचा ऊस तत्परतेने कारखानापर्यंत पोहचवण्याचा यशस्वी प्रयत्न करावा. तो तुम्ही करतातच, याबद्दल शंका नाही. परंतु काही वेळा चार ते पाच दिवस उसाची ट्रॉली रस्त्यातच थांबते, त्यावेळी मात्र जीव तुटतो. तेंव्हा याची काळजी घ्यावी, हि विनंती.