आभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार
बांबवडे :आयुष्याच्या पुस्तकाला नेमकी किती पाने असतात, हे कोणालाच माहित नसते. त्यामुळे नेमकं कोणतं पण सोनेरी ठरतं, हे माहित नसतं. त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक पण सोनेरी असावं, यासाठी सत्कृत्याची गरज असते. ती आपण पूर्ण करीत जायचं. हेच आयुष्यातील सत्कर्म ठरतं.

आज आयुष्याच्या पुस्तकातील ५४ पाने उलटली. प्रत्येक पानाला आजवर प्रामाणिकतेचा सुगंध ठेवण्यात यशस्वी झालो. या ५४ पानांमध्ये अनेकवेळा कुटुंबातील प्रत्येकाची हेळसांड च खूप झाली. तरी कुटुंबातील प्रत्येकाने जरासुद्धा तक्रार केलेली नाही. परंतु त्यांना झालेल्या असुविधांची मला पूर्ण जाणीव आहे. कारण सर्व गोष्टी उपलब्ध करायच्या असतील, तर वेगळे मार्ग चोखाळायला लागतात. ते आमच्याकडून जमले नाही, आणि जमणार नाही. त्यामुळे कुटुंबाकडे मी दिलगिरी व्यक्त करतो.

आयुष्याच्या प्रत्येक पानाला आत्मीयतेचा सुगंध असावा, जोडलेल्या प्रेमाच्या नात्यांना जिव्हाळ्याचा ध्यास असावा.
आणि आमच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तिमत्वाला, श्रीकृष्णाच्या बासुरीला ” राधे ” चा भास असावा.

आम्हाला शुभेच्छा देणाऱ्या सर्व हितचिंतकांना, कळत नकळत राहून गेलेल्या सर्व प्रेम करणाऱ्या मंडळींना आभारफुलांची कृतज्ञतेची ओंजळ अर्पण.