… अन्यथा तोंड प्रत्येकालाच आहे.
बांबवडे : बांबवडे गावच्या चारी सीमांवर कचऱ्याचे साम्राज्य असलेले ढिगारे, म्हणजे बांबवडे गावाच्या सत्ताधाऱ्यांचे ते पाप आहे. कचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविणे, हि या सदस्य मंडळाची जबाबदारी होती. परंतु त्यांनी आपली जबाबदारी पूर्ण केली नाही. म्हणूनच बांबवडे गावाची अब्रू खऱ्या अर्थाने वेशीवर सत्ताधाऱ्यांनी च टांगली आहे. आणि विरोधकांनी प्रकल्पाला विरोध केला, असे म्हणणे म्हणजे आपल्या पापाचे खापर विरोधकांच्या माथी मारणे , असे आहे. असे मत श्री महादेव ग्रामविकास आघाडी चे श्री अभयसिंह चौगुले यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले कि, विरोधकांनी प्रदूषणाच्या नावाखाली कचरा उठविण्यास विरोध केला. हे अर्धसत्य आहे. मागील बांबवडे ग्रामपंचायत च्या निवडणुकीत कचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्याचे आश्वासन संबंधित सत्ताधारी मंडळींनी दिले होते. दरम्यान गावातील कचरा उचलून एके ठिकाणी डंप करणे , म्हणजे कचरा व्यवस्थापन प्रकल्प नव्हे. कचरा व्यवस्थापन प्रकल्प म्हणजे कचरा उठविण्यासोबत त्याचे सुका कचरा, ओला कचरा याचे वर्गीकरण करून, त्याची विल्हेवाट लावणे, या सगळ्या प्रक्रियेला कचरा व्यवस्थापन प्रकल्प म्हणतात. अर्धसत्य मांडून बांबवडे ग्रामस्थांची कोणाला फसवणूक करता येणार नाही. जनता पूर्वीसारखी भोळी राहिलेली नाही. प्रत्येकाला सगळ्या गोष्टी कळत आहेत.
फक्त एकसूत्री कारभार करण्यासाठी कोणालाही विचारात न घेता गेली पाच वर्षे कारभार केला गेला. दरम्यान कचरा उठविण्यास विरोध केला , असे काही मंडळींचे म्हणणे आहे, असे समजते. परंतु त्या मंडळींना एक विनंती आहे कि, कचरा एके ठिकाणी साठविला , तर त्याचे निश्चित प्रदूषण होणार, हे सांगण्यासाठी संशोधकाची गरज नाही. उलट केवळ प्रदूषण नव्हे, तर मलेरिया सारखे संसर्ग साथीचे रोग पसरण्याची देखील दाट शक्यता आहे. परंतु कचरा प्रकल्पास विरोध करण्यासाठी विरोधकांनी कचरा उठविण्यास विरोध केला, असे जर म्हणणे असेल, तर या बाबींवर ग्रामसभेत, तक्रार का मांडली नाही. याही पुढे जावून गावचे आरोग्य जपण्यासाठी विशेष ग्रामसभा बोलावून, ग्रामस्थांकडून सूचनांची मागणी का केली गेली नाही.? जर कोण दोषी असेल, तर ग्रामस्थ याबाबत निर्णय घेतील, अशी भूमिका का घेतली गेली नाही ? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. तेंव्हा मागे लक्ष न घालता , भविष्यात आपण गावासाठी काय करणार, याची भूमिका मांडल्यास ते अधिक संयुक्तिक ठरेल. आणि निवडणुका सुद्धा विना क्लेशात पार पडतील. अन्यथा तोंड प्रत्येकाला आहे. असे हि श्री अभयसिंह यांनी सांगितले.

आणि आम्ही केवळ घोषणा नव्हे, तर खऱ्या अर्थाने कचरा व्यवस्थापन प्रकल्प बांबवडे गावात आम्ही राबविणार आहोत. याचबरोबर अनेक मुद्दे गावाच्या विकासासाठी राबविणार आहोत. या घोषणा नव्हे, तर आमचा वचननामा आहे. आणि तेदेखील केवळ राजकारणासाठी नव्हे, तर गावाच्या विकासासाठी आम्ही ग्रामस्थांना दिलेला शब्द आहे. म्हणूनच श्री महादेव ग्रामविकास आघाडी आपल्या शब्दाला ठाम राहणार आहे. तेंव्हा या आघाडी ला प्रचंड मतांनी निवडून आणा, आणि गावाच्या विकासात मोलाचा सहभाग नोंदवा, असे आवाहन देखील श्री महादेव ग्रामविकास आघाडी च्या वतीने श्री अभयसिंह चौगुले यांनी केले आहे.