बांबवडे येथील शेळके कॉम्प्लेक्स मध्ये दातांचे डॉ.सागांवकर यांचे स्व जागेत स्थलांतर – दि.१६ डिसेंबर २०२२ सकाळी १०.०० वा.
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे येथील दातांच्या दवाखान्याचे डॉ. जयवंत सागांवकर यांनी सर्व सुविधांनी युक्त असलेल्या स्वजागेत स्थलांतर केले असून, येथील अंबीरा ओढा शेजारी असलेल्या शेळके कॉम्प्लेक्स मध्ये आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत हा स्थलांतर संपन्न होत आहे.

शुक्रवार दि. १६ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता स्वजागेत स्थलांतरित होणार आहेत. यासाठी आपल्या सगळ्यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. असे मत डॉ. जयवंत सागांवकर यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.

डॉ. जयवंत सागांवकर हे बी. डी. एस. ( एम.यु.एच.एस. ) या पदवीने सन्मानित असून, त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ.अर्चना सागांवकर यादेखील बी. डी. एस. (मुंबई ) या पदवीने सन्मानित आहेत. आपल्या ज्ञानाचा ग्रामीण भागाला उपयोग व्हावा, या अनुषंगाने हे दाम्पत्य बांबवडे इथं गेली १७ वर्षे कार्यरत आहेत.

त्यांच्याकडे येणारे रुग्ण हे देखील खात्रीशीर पणे आपल्या डॉक्टरांवर विश्वास ठेवतात, कारण त्यांच्यावर वेळीच योग्य निदान, आणि वेळीच उपचार होतात. असे डॉक्टरांचे कार्य आहे.
म्हणूनच त्यांनी आपल्याला आग्रहाचे निमंत्रण दिले आहे.
.