शंभू महादेवाच्या नावानं विजयाचा झेंडा लागणार – श्री भगतसिंग चौगुले.


बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी , हि तालुक्यातील मोठी बाजारपेठ आहे. याकारणाने इथं रहदारी देखील अधिक आहे. त्यामुळे पार्किंग व्यवस्था हा सगळ्यात मोठा प्रश्न होत आहे. यासाठी दुचाकी आणि चार चाकी वाहनांचे सूत्रबद्ध पार्किंग व्यवस्था करून, व्यावसायिकांना भेडसावणारा हा प्रश्न आम्ही श्री महदेव ग्राम विकास आघाडी च्या माध्यमातून सोडवणार आहोत. असे मत सरपंच पदाचे उमेदवार श्री भगतसिंग चौगुले यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना व्यक्त केले.


ते पुढे म्हणाले कि, प्रतिवर्षी सार्वजनिक गणपती विसर्जनाची नेहमीच पंचायत होत असते. यासाठी वेगळी सुविधा आपण निर्माण करून, गणेश भक्तांना एकप्रकारचा दिलासा देणार आहोत. त्याचबरोबर घरगुती गणपती विसर्जन साठी सुद्धा हि सुविधा आपल्याला वापरता येईल. यामुळे गणेशभक्तांमध्ये चैतन्य निर्माण होईल, असेच काम आपण करणार आहोत.


बाजारपेठेसाठी सुलभ शौचालयाचे नियोजन आहे. यामुळे व्यापारी आणि ग्राहक यांच्यातील अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. येथील पाझर तलावाच्या स्वच्छतेसाठी लाखो रुपयांचा निधी आणण्यात आला,तो वाया देखील गेला. या तलावाची स्वच्छटा करून, इथं बोटिंग सुविधा सुरु करण्याचा मानस असून, याठिकाणी पर्यटनस्थळ निर्माण करणार आहोत.


महादेव मंदिराचे सुशोभिकरण करून, तिथे सर्वांग सुंदर ओपन जीम साहित्य बसवून, त्याचबरोबर लहान मुलांच्या खेळाचे साहित्य बसवून आबालवृद्धांना प्रत्येक सायंकाळ मनोहारी होईल, असा आमचा प्रयत्न असणार आहे. याचबरोबर गावातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत, यासाठी अनेक कुटिरोद्योग आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.
यासाठी आपल्या मत रुपी सहकार्याची आवश्यकता आहे. ज्याच्या माध्यमातून श्री महादेव ग्रामविकास आघाडी आपल्या विजयाचा झेंडा शंभू महादेवाच्या नावाने लावेल, अशी खात्री आहे. असेही मत श्री भगतसिंह चौगुले यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना व्यक्त केले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!