२० वर्षांपूर्वीची अवस्था बदलण्यासाठी च श्री महादेव ग्रामविकास आघाडी- श्री स्वप्नील घोडे-पाटील


बांबवडे : गेली २० वर्षे विकासापासून जर कोणी वंचित असेल, तर तो प्रभाग क्र. ४ असेल. येथील गरीब जनतेला धाक दपटशा दाखवून केवळ मतांची बेरीज करणे, एवढेच काम सत्ताधारी मंडळींनी आजवर केले आहे. परंतु स्व.अशोकराव घोडे-पाटील यांचा विकासाचा वसा आणि वारसा आम्ही जपणार आहोत. दिन दलित आणि पिचलेल्या समाजाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचा आमचा यशस्वी प्रयत्न राहील. हे निवडणुकीतील आश्वासन नसून आम्ही दिलेला शब्द आहे. आणि तो कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणार, यात शंका नाही. फक्त यासाठी आपल्या प्रभाग क्र. ४ मधील जनतेच्या अनमोल सहकार्याची आवश्यकता आहे. असे मत अशोकराव घोडे-पाटील यांचे चिरंजीव स्वप्नील घोडे-पाटील यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.


स्वप्नील यावेळी पुढे म्हणाले कि, आजवर अनेक दिन दलित जनतेसाठी घोडे=पाटील घराणे नेहमीच धावून येत आले आहे. परंतु स्व. अशोकभाऊ यानंतर त्याचे मतांमध्ये परिवर्तन होताना, आम्ही कमी पडत आहोत. या प्रभागात गेल्या २० वर्षापूर्वी असलेली पाण्याची परिस्थिती जैसे थे आहे. आजही इथली जनता पाण्यासाठी तहानलेलीच आहे. इथला आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या समाजाला शासनाची कोणतीही योजना पाहायला मिळालेली नाही. इथे घरांशिवाय राहणारी मंडळी असूनसुद्धा घरकुल नाही.
इथं १५ वर्षांपूर्वी झालेला एखादा कॉंक्रिट रस्ता सोडला, तर आजही गावांतर्गत रस्त्यांची अवस्था जैसे थे च आहे. इथं असलेला धनगर समाज यांना सुद्धा रस्ता नाही. शेळी मेंढी पालन योजनांच्या माध्यमातून मिळणारी सबसिडी अद्याप नाही. किंवा त्या योजना च या प्रभागाला अवगत नाहीत. इथं असलेल्या डवरी समाजाला तर गावकुसाबाहेर टाकलेल्या लोकांसारखी परिस्थिती आहे. झोपड्या बांधून राहिलेल्या या मंडळींना सार्वजनिक शौचालय नाही.


आत्ता इथली परिस्थिती खऱ्या अर्थाने बदलायची आहे. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या जनतेला शासनाच्या विविध योजना आम्ही प्राप्त करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील. इथले गावांतर्गत रस्ते यावेळी निश्चित पूर्ण करून घेतले जातील. इथली पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वतंत्र टाकी बांधून पूर्ण करण्यात येईल. धनगर समाजाला असणाऱ्या सबसिडी च्या योजना त्या समाजापर्यंत आम्ही पोहचवणार आहोत.


इथल्या बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल, यासाठी प्रयत्नशील असणार आहोत. त्यासाठी नवीन दुकानगाळे निर्माण करून या तरुणांना व्यवसाय करण्यासाठी माफक भाड्याच्या दरात व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देणार आहोत. इथला बेरोजार तरुण आर्थिकदृष्ट्या संपन्न करण्यासाठी त्याला व्यासायात उतरवून समाजात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. इथल्या गावकुसाबाहेर टाकलेल्या समाजामध्ये अमुलाग्र परिवर्तन करणार आहोत. त्यांच्यासाठी सार्वजनिक शौचालय बांधून आया-बहिणींची होणारी पहाटेची फरपट थांबविण्याचा आमचा मानस आहे.


एकेकाळी जनावरांचा बाजार म्हटलं कि, बांबवडे गावचे नाव पुढे यायचे.परंतु गेल्या तीन पंचवार्षिक मध्ये हे नाव मागे पडले आहे. ते नाव आणि गावाची जनावरांच्या बाजाराची इभ्रत पुन्हा एकदा पुनर्स्थापित करण्याचा आमचा मनोदय आहे. उपेक्षित समाजाला न्याय देवून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर या महामानवांनी दिलेली शिकवण सत्यात उतरवणार आहोत. समाजातील प्रत्येक घटकाला समान संधी मिळाली पाहिजे. धनगर समाज असो, कि, डवरी समाज यांना मानाने जगण्यासाठी आर्थिकमानामध्ये असलेली विषमता कमी करणार आहोत. इथला मराठा समाज सुद्धा जो आर्थिकदृष्ट्या मागास आहे, त्यांच्यासाठी सुद्धा शासनाच्या सर्व योजना आपल्या दारापर्यंत आपण घेवून येणार आहोत.


स्व.अशोकभाऊ यांनी जो विकासाचा वसा आणि वारसा आमच्या घोडे-पाटील तरुण मंडळींपर्यंत पोहचवला आहे, तो पुढे नेण्याचे काम आम्ही प्रामाणिकपणे करणार आहोत. इथं फक्त आपल्या मतांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. ” एक मत आमच्यासाठी , आम्ही सदैव विकासासाठी ” तत्पर राहणार आहोत. असेही श्री स्वप्नील घोडे-पाटील यांनी सांगितले आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!