“करा बदल, चांगलेच घडल”- सुरेश म्हाऊटकर
नमस्कार बांबवडे ग्रामपंचायत निवडणूक 2022
बांबवडे गावची ग्रामपंचायत निवडणूकीत माझी मुलगी कुमारी शेफाली सुरेश म्हाऊटकर हि पंचवार्षिक निवडणूक लढवित आहे. मी गेली 14/15 वर्षे सामाजिक चळवळीत ऊस, दुध उत्पादकांना त्यांच्या घामाचे दाम मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून काम केलेले आहे. बांबवडे बाजार पेठ ही शाहूवाडी तालुक्यातील नामांकित बाजारपेठ आहे. शेतकऱ्यांच्या खिशामध्ये येणारा पैशाचा लाभ याच बाजारपेठेतील छोटे मोठे व्यावसायिक व व्यापारी यांनाच झालेला आहे. व्यावसायिक दृष्ट्या प्रगत असलेले बांबवडे गाव , पण याच गावात अनेक प्रलंबित प्रश्न अजूनही बाकी आहेत. या बाजारपेठेमध्ये येणाऱ्या बाहेरगावातील लोकांना स्वच्छता ग्रह ची आवश्यकता आहे, या बाजारपेठेमध्ये वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी पार्किंग व्यवस्था करणे गरजेचे आहेत. कचरा व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. प्लास्टिकचा कचरा हे येणाऱ्या काळात मोठे आव्हान आहे. प्लास्टिक मुक्त बांबवडे हि संकल्पना आहे. पिण्याचे पाणी मुबलक असूनही पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. “पाणी वाचवा, देश वाचवा ” गावातील शाळेचा शैक्षणिक दर्जा खालवलेला आहे. बांबवडे गावातील मुले शिक्षणासाठी शाहूवाडी , सागाव, देवाळे , परखंदळे , याठिकाणी बाहेर गावी जात आहेत .असे इतर अनेक प्रश्न आहेत जेणेकरून हे प्रश्न मार्गी लावण्यासाठीचे प्रयत्न करणार आहे. तरी आपण सुज्ञ मतदार म्हणून या सर्व समस्यांचा विचार करून आम्हाला या निवडणुकीमध्ये निवडून देऊन आपल्या हाक्काची प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, हि विनंती.
“करा बदल, चांगलेच घडल”
कळावे आपला,
सुरेश म्हाऊटकर बांबवडे,
स्वाभिमानी शेतकरी संघटना, ता. अध्यक्ष
मो. नं. 9172741200