राजकीयसामाजिक

चुरशीच्या लढतीत नेमका गुलाल कोणाला ?


बांबवडे : बांबवडे ग्रामपंचायत निवडणूक अतिशय चुरशीची ठरत आहे. सत्ताधारी मंडळींनी दिलेली आश्वासने बऱ्याच अंशी पूर्ण न केल्याने त्याचा फायदा श्री महदेव ग्रामविकास आघाडी ला होण्याची दाट शक्यता आहे. अशा अनेक कारणांमुळे बांबवडे तालुका शाहुवाडी च्या ग्रामपंचायत च्या राजकारणात अमुलाग्र बदल घडण्याची चिन्हे दिसत आहेत.


सध्याच्या घडीला सत्ताधारी श्री महादेव ग्रामविकास पॅनेल निवडणुकीत उतरत आहे. यामध्ये माजी सरपंच विष्णू यादव या पॅनेल चे नेतृत्व करीत आहेत. तर श्री महादेव ग्रामविकास आघाडी चे नेतृत्व श्री अभयसिंह चौगुले हे करीत आहेत. त्यांच्या पाठीशी गावातील जुनी जाणती माणसे ठामपणे उभी आहेत. जागे अभावी सर्वच नवे टाकली जात नाहीत. त्याचबरोबर तालुक्यातील अनेक राजकीय गट या आघाडी च्या पाठीशी असल्याचे निदर्शनास येत आहे.


दरम्यान विष्णू यादव हे स्वत: जरी निवडणुकीला उभे राहिले नसले तरी त्यांचे बंधू युवराज यादव शिराळकर हे सरपंच पदाचे उमेदवार आहेत. श्री महदेव ग्रामविकास आघाडी चे श्री भगतसिंग चौगुले हे सुद्धा सरपंच पदासाठी उभे आहेत.दरम्यान बांबवडे बचाव परिवर्तन पॅनेल चे श्री पांडुरंग वग्रे आबा हे सुद्धा सरपंच पदासाठी उभे आहेत. दरम्यान दोन प्रभागात श्री विष्णू यादव यांनी एका दांपत्याला उभे केले आहे. एका प्रभागात सुरेश कांबळे तर त्यांची पत्नी दुसऱ्या प्रभागात उभी आहे. त्यामुळे नवरा-बायको दोघेही निवडणुकीला सामोरे जात आहेत. या घटनेमुळे हि गोष्ट चर्चेची होत आहे.


दरम्यान माजी उपसरपंच हे स्वत: च्या प्रभागात उभे न राहता दुसऱ्या प्रभागातून निवडणूक लढवीत आहेत. यामुळे नेमके कोणते राजकारण श्री महादेव ग्रामविकास पॅनेल साध्य करणार आहे. हे अद्याप जनतेला कळलेले नाही. त्यांच्या विरोधात एक युवक निवडणूक लढवीत आहे. त्यामुळे बांबवडे ग्रामपंचायत नेमके कोणते राजकारण घडवीत आहे. याचा पत्ता नेमका २० डिसेंबर लाच कळेल.


एकंदरीत गावातील चारही प्रभागात चुरस मात्र ठरलेली आहे. प्रभाग क्र. १ मध्ये आघाडी चे उमेदवार सुरेश नारकर पुन्हा एकदा कंबर कसून मैदानात उतरले आहेत. तर त्यांच्या विरोधात पॅनेल चे राहुल बंडगर, व बांबवडे बचाव परिवर्तन पॅनेल चे सचिन मूडशिंगकर, असे दोन्ही उमेदवार उभे ठाकले आहेत. त्यामुळे ३० वर्षांचा अनुभव असलेले मुरब्बी उमेदवारांच्या समोर दोन विरोधक आहेत. त्यामुळे इथं तिरंगी लढत होत आहे.


एकंदरीत बांबवडे ग्रामपंचायत म्हणजे ” हाय व्होल्टेज ” वर आहे. इथं खऱ्या अर्थाने दुरंगी लढत होत आहे. श्री महादेव ग्रामविकास आघाडी विरुद्ध श्री महादेव ग्रामविकास पॅनेल. या चुरशीच्या लढतीत विजय कोणाचा हा प्रश्न मानाचा आणि प्रतिष्ठे चा झाला आहे. प्रभाग क्र. २ मध्ये असलेले चौगुले मंडळी आणि साखर कारखान्याचे एकनिष्ठ मतदान आपला रंग दाखवणार आहे. त्यामुळे चुरस लवकरच सगळ्यांच्या समोर येणार आहे. हे जरी खरे असले तरी सध्याच्या घडीला प्रचाराच्या माध्यमातून चारही प्रभागात आघाडी अग्रेसर असल्याचे दिसत आहे. तर आघाडी चे सरपंच पदाचे उमेदवार भगतसिंग चौगुले यांनी आपला संपर्क एवढा वाढवला आहे कि, त्यांची प्रभागातून फिरण्याची कितवी फेरी हे लक्षात ठेवणे कठीण झाले आहे. त्यामुळे चुरशीच्या लढतीत नेमका गुलाल कोणाला ? हा प्रश्न महत्वाचा झाला आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!