शिवराज गवड-पाटील दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित


बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील शिवराज गवड-पाटील यांना ‘ फड ‘ या चित्रपटामध्ये उत्कृष्ट अभिनयाबद्दल दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याबद्दल साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने हार्दिक अभिनंदन.


दि.१७ डिसेंबर रोजी पुणे इथं हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. दादासाहेब फाळके इंटरनॅशनल बेस्ट अॅक्टर पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेत्री केतकी माटेगावकर व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ चे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्याहस्ते येथील अभिनेते शिवराज गवड-पाटील यांना प्रदान करण्यात आला. या अनुषंगाने बांबवडे पंचक्रोशीतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


शिवराज गवड-पाटील यांनी या अगोदर अनेक सिनेमातून अभिनय केला आहे. एका चित्रपटाचे ते निर्माते सुद्धा राहिले आहेत. पुनश्च त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!