congratulationsराजकीयसामाजिक

रणवीरसिंग गायकवाड यांच्याहस्ते नवोदित उमेदवारांचा सन्मान

रणवीरसिंग गायकवाड यांच्याहस्ते नवोदित उमेदवारांचा सन्मान


बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत येथील श्री महादेव ग्रामविकास आघाडी ने सरपंच पदासह १२ जागा जिंकल्या, आणि ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. हा विजय न भूतो न भाविष्यति असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या अनुषंगाने सर्व उमेदवारांचा सन्मान केडीसी बँकेचे संचालक श्री. रणवीरसिंग गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला.


यावेळी आघाडी चे सर्व उमेदवार यांच्यासहित पॅनेल चे नेते श्री बाळासाहेब चौगुले, चौगुले गुरुजी, यांच्यासहित सैदापूर येथील दळवी सरकार, बांबवडे चे उद्योगपती असलेले स्व. रवींद्र फाटक यांचे चिरंजीव नंदू शेठ फाटक, उद्योगपती तानाजीराव चौगुले, पुणे येथील उद्योगपती श्री प्रकाश पाटील,बांबवडे येथील शामराव कांबळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा संपन्न झाला.

यावेळी श्री रणवीरसिंग गायकवाड म्हणाले कि, आपण सर्व जागा जिंकून एक ऐतिहासिक विजय मिळवला आहे. याबद्दल आघाडीचे अभिनंदन आहे. परंतु सत्तेची हवा डोक्यात जावू देवू नका. ज्या कामासाठी बांबवडे ग्रामस्थांनी तुम्हाला निवडून दिले आहे. त्यांची विकासकामे पूर्ण करा. विधानसभा निवडणूक येईपर्यंत आपल्या आघाडीचे सहकार्य आमच्यासोबत असू द्या, असे आवाहन देखील यावेळी श्री रणवीरसिंग यांनी केले.

यावेळी प्रास्ताविकपर मनोगतात मुकुंद पवार म्हणाले कि, विजयाच्या आनंदाचा उपभोग घ्या. त्याचबरोबर जनतेला दिलेला शब्द पाळा. आणि भविष्यात गावाचा असा विकास करण्याचा प्रयत्न करा, कि जनता तुम्हाला डोक्यावर घेईल. अहंकाराचा नाश होतो, तो अहंकार तुमच्या डोक्यात जावू देवू नका. ग्रामस्थांशी सौजन्याने वागा, असे आवाहन देखील श्री मुकुंद पवार यांनी केले.


यावेळी सरपंच श्री. भगतसिंग चौगुले, श्री सुरेश नारकर, सौ कविता मुकुंद प्रभावळे, सौ सीमा शरद निकम, सौ. मनीषा दीपक पाटील, दीपक हिंदुराव पाटील, सौ. सुनिता विजय कांबळे, कु. दिग्विजय संजय पाटील, सौ शोभा संभाजी निकम, श्री स्वप्नील अशोकराव घोडे-पाटील, श्री विद्यानंद मारुती यादव, सौ वंदना बाजीराव बंडगर, या उमेद्वारांसाहित सौ. राखी सुरेश नारकर, आघाडीप्रमुख श्री अभयसिंह चौगुले, दीपकराव शामराव पाटील, आनंदराव प्रभावळे, संभाजीराव निकम, दिलीप बंडगर, महादेव निकम, शुभम नारकर, समीर पाटील सावे, पत्रकार दशरथ खुटाळे, उमेश चव्हाण,आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.


कार्यक्रमाचे आभार व्यक्त करताना, श्री सुरेश नारकर म्हणाले कि, आम्ही सर्वजण एकदिलाने काम करून गावाचा विकास करण्याचा यशस्वी प्रयत्न करू.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!