केडीसी बँकेच्या भेडसगाव शाखेत ग्राहक मेळावा संपन्न
बांबवडे : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा भेडसगाव च्यावतीने ग्राहक मेळावा, तसेच ठेवीदार मेळावा भेडसगाव इथं संपन्न झाला.

या मेळाव्यास ग्राहकांचा तसेच ठेवीदारांचा उदंड प्रतिसाद लाभला. जिल्हा बँकेच्या वतीने विभागीय अधिकारी श्री एस.के. सातपुते यांनी ग्राहकांना बँकेच्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी कर्जदार, ठेवीदार, मायक्रो एटीएम चे वाटप श्री सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी भेडसगाव नागरी पतसंस्थेला सहा कोटी ओव्हरड्राफ्ट कर्ज , तर डॉ.एस.एन.पाटील पतसंस्थेला नव्वद लाख ओव्हरड्राफ्ट मंजुरीचा प्रस्ताव देण्यात आला.

या मेळाव्यास तालुका विशेष वसुली अधिकारी डी.पी. कांबळे, शाखाधिकारी श्री यु.पी. कोकणे, निरीक्षक एस.व्ही. कदम, कॅशीअर श्री यु.बी. लोहार, क्लार्क श्री. आर. डी. थोरात, श्रीमती धनश्री जामदार आदी मंडळी यावेळी उपस्थित होते.