शॉपिंग सेंटर साठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर- अमोल केसरकर
मलकापूर प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यातील मलकापूर नगरपालिकेला राज्य शासनाकडून शॉपिंग सेंटर साठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती, माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर यांनी दिली.

मलकापूर शहरातील जुने मंगलधाम इथं शॉपिंग सेंटर बांधणे ३ कोटी रुपये, जुन्या पालिका इमारतीच्या जागी शॉपिंग सेंटर उभारण्यासाठी २ कोटी रुपये, असा एकूण ५ कोटी रुपयांचा निधी नगरविकास मंत्रालयाकडून मंजूर करण्यात आला आहे.

यामुळे पालिकेच्या उत्पन्नात भर पडणार आहे. त्याशिवाय सुशिक्षित बेरोजगारांसाठी, रोजगाराचे साधन उपलब्ध होण्यासाठी छोटे-मोठे व्यवसाय करण्यासाठी पालिकेचे गाळे उपलब्ध होणार आहेत.

मलकापूर शहराबरोबर असणारे पोस्ट कार्यालय, सहाय्यक निबंधक कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय शहरात आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार डॉ. विनय कोरे यांनी सांगितले.

निधी मंजूर करण्यासाठी माजी बांधकाम व आरोग्य सभापती, माजी के.डी. सी. सी. बँकेचे संचालक श्री सर्जेराव पाटील पेरीडकर, माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर, माजी उपनगराध्यक्ष दिलीप पाटील, प्रवीण प्रभावळकर, पालिका मुख्याधिकारी विद्या कदम, सर्व नगरसेवक व सदस्य यांचे सहकार्य लाभले.