३ जानेवारी २०२३ रोजी ” जन आक्रोश मोर्चा ” मलकापूर इथून सुरु होणार
मलकापूर प्रतिनिधी : सकल हिंदू समाजाच्या वतीने ३ जानेवारी २०२३ रोजी लव्ह जिहाद, धर्मांतरण, गोहत्या विरोधात ” हिंदू जन आक्रोश मोर्चा ” चे आयोजान करण्यात आले आहे.

हा मोर्चा ३ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १०.०० वा. सुरु होणार असून, मलकापूर नरहरी मंदिर, सुभाष चौक बाजारपेठ मार्गे, महामार्ग येळाणे ते शाहुवाडी तहसीलदार कार्यालय इथ जाणार आहे.

समाजात घडत असलेल्या घटनेच्या आणि त्रासाच्या विरोधात होत असलेला उठाव म्हणजे ” जन आक्रोश मोर्चा ” असणार आहे.

या मोर्च्यात तालुक्यातील हिंदू संघटना, वारकरी सांप्रदाय, व तालुक्यातील तमाम हिंदू समावेश होणार आहे.

या मोर्चासाठी प्रत्येक हिंदूंनी सहकुटुंब मोर्चात सामील व्हावे, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात येत आहे.