सामाजिक

यशवंत इंटरनॅशनल स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज डोणोली मध्ये ” बालिका दिन ” साजरा :क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती संपन्न


बांबवडे : श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ कोडोली, संचलित, यशवंत इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज डोणोली, तालुका शाहुवाडी येथे बालिका दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


या कार्यक्रमांमध्ये प्रतिमा पूजन, विद्यार्थ्यांची भाषणे, तसेच ‘ आठवडी बाजार ‘ या उपक्रमाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.


सदर कार्यक्रमाला पालकांचा सहभाग सुद्धा मोठ्या प्रमाणावर होता. सदर उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना खरेदी-विक्री , आर्थिक नियोजन , सामाजिक मुल्यांची माहिती दिली.


सदर उपक्रमांची संस्थेचे सचिव डॉक्टर जयंत पाटील, संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पद्मजा पाटील, व संस्थेच्या विश्वस्त सौ. विनिता पाटील यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!