शिंपे च्या तालमीतील पैलवान महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत : पैलवान अनिल पाटील यांची निवड
बांबवडे : कोथरूड पुणे इथं होत असलेल्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेसाठी शिंपे तालुका शाहुवाडी येथील पैलवान अनिल पाटील यांची निवड झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, शिंपे येथील सुपुत्र अनिल पाटील मुंबई पोलीस यांची ८६ किलो वजनी गटात मुंबई शहर तालीम संघाच्या वतीने निवड झाली असून, ते मुंबई शहर चे नेतृत्व करणार आहेत.
अनिल पाटील हे व्यक्तीमात्व प्रामाणिकपणे कुस्तीवर प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहे. ज्या दिवशी ते मुंबई पोलीस मध्ये भरती झाले, त्याच दिवशी त्यांचे वडिलांचे छत्र हरपले. आई ची हतबलता पाहून ते यात गुरफटतील अशी परिस्थिती असताना, त्यांचे लाल मातीवरील प्रेम त्यांना गप्प बसू देत नव्हते. तालीमितील त्यांचे मित्र व जिवलग यांच्या प्रोत्साहनामुळे ते पोलीस खात्यात यशस्वी अधिकारी झाले.
याचबरोबर त्यांचे वस्ताद प्रकाश तानवडे मुंबई शहर तालीम संघ चे सरचिटणीस सागाव तालुका शिराळा, वस्ताद रामचंद्र पाटील शित्तूर तर्फ मलकापूर , मुंबई पोलीस कोच नथुराम चव्हाण यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. तसेच शिंपे गावातील कुस्ती चा पाया घालणारे वस्ताद आनंदा पाटील, दत्ता पाटील यांचेही त्यांना मार्गदर्शन लाभले.