थेरगाव च्या समर्थ पाटील ची राज्यस्तरीय हॉली बॉल साठी निवड
बांबवडे : थेरगाव तालुका शाहुवाडी येथील समर्थ पाटील या १५ वर्षीय विद्यार्थ्याची राज्यस्तरीय पासिंग हॉली बॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याच्या या निवडीमुळे त्याच्या कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अशी माहिती थेरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते निवास पाटील व मारुती पाटील यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.

महाराष्ट्र राज्य पासिंग हॉली बॉल संघटनेच्या वतीने वडगाव तालुका हातकणंगले इथं झालेल्या १६ वर्षाखालील विभागीय स्पर्धेतून होणाऱ्या ४७ व्या राज्यस्तरीय पासिंग हॉली बॉल संघात तळसंदे तालुका हातकणंगले येथील विश्ववारणा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चा विद्यार्थी समर्थ मारुती पाटील याची निवड करण्यात आली आहे.

समर्थ मारुती पाटील हा विद्यार्थी थेरगाव तालुका शाहुवाडी येथील कायमचा रहिवाशी आहे. त्याचे वडील मारुती पाटील हे शेतकरी कुटुंबातील असून, त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही, त्यांनी शिक्षणाला अधिक महत्व देत, आपल्या मुलाला तळसंदे येथील पब्लिक स्कूल मध्ये शिकण्यासाठी ठेवले आहे. हा विद्यार्थी सध्या १० वी इयत्तेत शिकत आहे.

या स्पर्धेसाठी समर्थ पाटील याला विश्ववारणा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कॅप्टन गणपतराव घोडके, सचिव डी. पी. पाटील, व्यवस्थापक दीपक महाडिक, विभागीय हॉली बॉल सचिव शिवाजी पाटील , जिमखाना प्रमुख प्रा. संभाजी पाटील, यांचे प्रोत्साहन लाभले.

तसेच प्रशिक्षक सागर सुतार, शुभम जाधव, रमेश पाटील, हॉली बॉल इंडिया कोच अजित पाटील, गौरव खामकर यांचे मार्गदर्शन लाभले.