८ जानेवारी रोजी आरपीआय गवई गटाचा सरूड येथे कार्यकर्ते मेळावा – प्रकाश माने
बांबवडे : सरूड तालुका शाहुवाडी येथील महात्मा गांधी हायस्कूल धृवानाथ घोलप सांस्कृतिक सभागृह मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( गवई ) सरूड तालुका शाहुवाडी शाखा उद्घाटन सोहळा व कार्यकर्ते प्रबोधन मेळावा ८ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११.०० वा.संपन्न होत आहे. अशी माहिती शाहुवाडी तालुका अध्यक्ष प्रकाश माने यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.
या कार्यक्रमास आरपीआय चे सातारा जिल्हा अध्यक्ष संजय गाडे, शेकाप चे भाई भारत पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी आरपीआय चे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष आयु.रंगराज कांबळे हे उपस्थित राहणर आहेत.

कार्यक्रमास अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. आयु. भाऊसाहेब कांबळे ( पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष, तथा जिल्हा सरचिटणीस ), आयु. चंद्रकांत कांबळे ( महासचिव आरपीआय ), आयु. सिद्धांत देशमुख ( जिल्हा युवा अध्यक्ष आरपीआय ), आयु. प्रकाश माने ( शाहुवाडी तालुका अध्यक्ष आरपीआय ), आयु. प्रदीप माने – युवा नेते, आयु. साताप्पा कांबळे ( जिल्हा उपाध्यक्ष ),आयु. बाजीराव गायकवाड शहर अध्यक्ष (आरपीआय ), आयु. विशाल कांबळे ( सातारा जिल्हा युवा अध्यक्ष ( आरपीआय ), आयु. आशुतोष वाघमोडे सातारा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष ( आरपीआय ),
कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष आयु. प्रकाश नाईक सर, अक्षय माने सर.असणार आहेत.

कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शाहुवाडी तालुका अध्यक्ष प्रकाश माने यांनी केले आहे.