श्री बाळासाहेब खुटाळे यांचा चौगुले मित्र परिवाराच्यावतीने सत्कार संपन्न
बांबवडे : बांबवडे येथील श्री बाळासाहेब खुटाळे (आप्पा ) यांचे श्री बापू चौगुले ( गुरुजी ), बाळासाहेब चौगुले आणि मित्र परिवाराच्या वतीने त्यांचे बुके देवून अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या भावी सहकार कार्यात त्यांना उदंड यश प्राप्त होवोत, अशा शुभेच्छा सुद्धा चौगुले आणि मित्र परिवाराच्या वतीने देण्यात आल्या.

बांबवडे तालुका शाहुवाडी येथील बांबवडे नागरी सह. पतसंस्थेचे संस्थापक श्री बाळासाहेब खुटाळे यांची कोल्हापूर जिल्हा पतसंस्था फेडरेशन च्या संचालक पदी निवड झाली आहे. यानिमित्त हा छोटे खाणी सत्कार त्यांच्या राहत्या घरी संपन्न झाला.

श्री बाळासाहेब खुटाळे हे खुटाळे उद्योग समूहा चे संस्थापक असून, बांबवडे व्यापारी वेल्फेअर असोसिएशन चे अध्यक्ष सुद्धा आहेत.

बांबवडे गावाच्या सामाजिक उपक्रमांमध्ये देखील त्यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो.

दरम्यान शिवशक्ती मित्र मंडळाचे अध्यक्ष संजय निकम, राजेंद्र निकम यांनी सुद्धा श्री बाळासाहेब खुटाळे यांचे बुके देवून अभिनंदन केले.

यावेळी श्री विनोद चौगुले, विजय चौगुले, अभयसिंह चौगुले माउली फुट वेअर चे मालक विठ्ठल पोवार, पत्रकार मुकुंद पोवार, आणि सहकरी उपस्थित होते.