सुपात्रे मध्ये भर दिवसा चोरी
बांबवडे : सुपात्रे तालुका शाहुवाडी इथं प्रकाश शंकर कांबळे वय ३९ वर्षे यांच्या राहत्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञातांनी भर दुपारी सुमारे १२.३०. ते २.३० वाजनेच्या दरम्यान सुमारे १,७२२०० रुपयांचे सोन्याचे दागिने तर रोख ६८३०० /- रुपये , मिळून २४०५००/- रुपयांची चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी कि, रविवार दि.८ जानेवारी २०२३ रोजी दुपारी १२.३० ते २.३० वाजनेच्या दरम्यान घरात कोणी नसताना घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून १,७२२०० रुपयांचे सोन्याचे दागिने तर रोख रक्कम ६८३००/- रुपयांची चोरी करण्यात आली आहे. सदर चोरी च्या तपासासाठी डॉग स्क्वॉड बोलवून तपास करण्यात आला.

सदर घटनेची शाहुवाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बांबळे अधिक तपास करीत आहेत.