बांबवडे ची वैष्णवी सिंघण हिची राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत वर्णी – ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक अभिनंदन
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे गावची वैष्णवी श्रीकांत सिंघण, हि विद्यार्थिनी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत बसली आहे. तर अथर्व श्रीकांत सिंघण हा ५ वी चा विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत बसला आहे. तसेच त्यांची नवोदय विद्यालय कागल साठी सुद्धा निवड झाली आहे. हि दोन्ही मुले गुरुनाथ ऑटोमोबाईल्स चे मालक श्रीकांत सिंघण यांची आहेत. त्यांच्या या यशाबद्दल गावातून तसेच पंचक्रोशीतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन .
नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शाहुवाडी तालुक्यात गुणवत्ता यादीत १८ विद्यार्थ्यांपैकी ८ विद्यार्थी परखंदळे विद्यामंदिर चे आहेत. शाहुवाडी तालुक्यातील एक तृतीयांश विद्यार्थी फक्त परखंदळे शाळेचे असल्याने परखंदळे गावात तसेच पंचक्रोशीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ५ वी , व ८ वी च्या एकूण २७ विद्यार्थ्यांपैकी परखंदळेचे ९ विद्यार्थी या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.
इयत्ता ८ वी मधील गुणवंत विद्यार्थी
१.वरद शहाजी लाड राष्ट्रीय गुणवत्ता धारक
२.वैष्णवी श्रीकांत सिंघण राज्य स्तरीय गुणवत्ता धारक
३.श्रेया विष्णू सुतार राज्य स्तरीय गुणवत्ता धारक
४.नीलम अनिल खोत राज्य स्तरीय गुणवत्ता धारक
५.प्रगती पांडुरंग व्हनागडे राज्य स्तरीय गुणवत्ता धारक
६.पायल केशव गावडे राज्य स्तरीय गुणवत्ता धारक
७.श्रावणी सदाशिव सुतार राज्य स्तरीय गुणवत्ता धारक
८.धृवराज अर्जुन पाटील राज्य स्तरीय गुणवत्ता धारक
२०२२-२३ सालात एन.एम.एम.एस. शिष्यवृत्ती परीक्षेत १२ विद्यार्थी पात्र ठरले असून, सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत ६ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
शाहुवाडी तालुक्यातील परखंदळे विद्यामंदिर चे यश निश्चितच कौतुकास्पद आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना श्री विक्रम पाटील सर, श्री जमीर सय्यद सर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच मुख्याध्यापक श्री भगवान पाटील सर, केंद्रप्रमुख,तथा विस्तार अधिकारी श्री सदाशिव थोरात सर, माजी गट शिक्षणाधिकारी नंदकुमार शेळके, विद्यमान गट शिक्षणाधिकारी सौ जयश्री जाधव मॅडम यांचेदेखील मार्गदर्शन लाभले.
पुनश्च यशस्वी विद्यार्थ्यांचे साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने हार्दिक अभिनंदन.