श्री स्वप्नील घोडे-पाटील यांची उपसरपंच पदी नियुक्ती होणार
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी च्या ग्रामपंचायत २०२२ च्या निवडणुकीत महादेव ग्रामविकास आघाडी ने आपले वर्चस्व प्रस्थापित करीत सर्व बारा जागा जिंकल्या. यामध्ये श्री भगतसिंग चौगुले यांची गावच्या लोकनियुक्त सरपंच पदी वर्णी लागली. उपसरपंच पदी स्व. अशोकराव घोडे-पाटील यांचे चिरंजीव श्री स्वप्नील घोडे-पाटील यांची वर्णी लागणार आहे. याबाबत नेते मानसिंगराव गायकवाड दादा, केडीसी बँकेचे संचालक रणवीरसिंह गायकवाड यांनी सर्व सदस्यांशी चर्चा करून, निर्णय घेतला आहे. उद्या दि.१२ जानेवारी २०२३ रोजी उपसरपंच पदाची निवडणूक संपन्न होणार आहे.

श्री स्वप्नील घोडे-पाटील यांचे, त्यांची उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने हार्दिक अभिनंदन .

श्री स्वप्नील घोडे- पाटील हे पदवीधर असून, त्यांना जयसिंगराव घोडे-पाटील , तसेच स्व. अशोकराव घोडे-पाटील यांचा राजकीय वारसा लाभला आहे. तसेच त्यांचे आजोबा श्री श्रीपती घोडे-पाटील हे सुद्धा राजकारणात सक्रीय होते. त्यामुळे राजकीय वारसा पिढ्यानपिढ्या चालत आला आहे.

श्री स्वप्नील हे एक मितभाषी व्यक्तिमत्व आहे. परंतु राजकारणाची त्यांना पुरती जाणीव आहे. त्यांना असलेल्या वारसा त्यांच्या राजकीय वाटचालीत मोलाचा ठरणार आहे. ते जनसुराज्य शक्ती पक्षाचे समर्थक आहेत. परंतु गावातील आघाडीत ते सहभागी असल्याने, त्यांना उपसरपंच पदाची जबाबदारी सर्वानुमते देण्यात आल्याचे समजते.