यशवंत नागरी च्या चेअरमन पदी स्वप्नील घोडे-पाटील, तर व्हा.चेअरमन पदी विश्वास कांबळे यांची बिनविरोध निवड
बांबवडे : यशवंत नागरी सह.पतसंस्थेच्या चेअरमन पदी श्री स्वप्नील अशोकराव घोडे- पाटील यांची तर व्हा.चेअरमन पदी विश्वास ज्ञानदेव कांबळे यांची नूतन बिनविरोध निवड करण्यात आली आहे. याबद्दल बांबवडे गावचे नूतन लोकनियुक्त सरपंच श्री भगतसिंग चौगुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या सत्कार प्रसंगी महादेव ग्रामविकास आघाडी चे प्रमुख श्री अभयसिंग चौगुले, विजय चौगुले, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष संदीप कांबळे डोनोलीकर, निवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कृष्ण कांबळे, अमोल सुर्यगंध दीपक कांबळे, राकेश कांबळे आदी मंडळी उपस्थित होते.

तसेच बांबवडे नागरी पतसंस्थेचे संस्थापक श्री बाळासाहेब खुटाळे, किरण खुटाळे, व माजी सरपंच श्री सागर कांबळे यांनी देखील श्री विश्वास कांबळे यांचा बुके देवून सत्कार केला.
याचबरोबर रिद्धी एंटर्प्रायझेस चे मालक राजेंद्र कांबळे यांनी देखील विश्वास कांबळे यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. विक्रम बांबवडेकर यांनी केले. तर आभार व्हा. चेअरमन विश्वास कांबळे यांनी मानले.