लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर ची शिवनेरी दर्शन सहल
शिराळा प्रतिनिधी : लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर चिखली, तालुका शिराळा या शाळेची शैक्षणिक सहल सन २०२२-२३ शिवनेरी दर्शन साठी नेण्यात आली.
गुरुवार दि.५ व ६ जानेवारी या दोन दिवसांच्या सहलीचे आयोजन करण्यात आले होते.

प्रथम सकाळी ४.३० वाजता बस चे पूजन करून, सहली च्या प्रवासाला सुरुवात करण्यात आली.
सर्वप्रथम सहल पुणे च्या दिशेने निघाली . प्रथम प्रतीबालाजी मंदिराचे दर्शन घेतले.

प्रतीबालाजी दर्शनानंतर जेजुरी, रांजणगाव, मोरगाव, थेऊर येथील गणपती चे दर्शन घेतले. त्यानंतर ओझर येथे मुक्काम करण्यात आला.
दुसऱ्या दिवशी लेण्याद्री, शिवनेरी, भीमाशंकर, देहू असा विद्यार्थ्यांचा प्रवास झाला.

या नंतर बस चिखली च्या दिशेने परतीच्या प्रवासाला लागली.
या सहली चे नियोजन डी.पी. गवळी सर, तसेच शिराळकर मॅडम यांनी केले.