उचत ग्रामपंचायत वर जनसुराज्य शक्ती पक्षाचे वर्चस्व
शाहुवाडी प्रतिनिधी : ग्रामपंचायत उचत तालुका शाहुवाडी च्या निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाने बाजी मारली आहे. श्री काळम्मादेवी परिवर्तन ग्रामविकास पॅनेल चे नेते श्री सुरेशराव बोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली हि निवडणूक लढविण्यात आली.


या निवडणुकीत माजी सभापती स्व. रामभाऊ लांबोरे यांचे पुतणे सतीश लांबोरे यांच्या पत्नी सौ माधुरी लांबोरे यांची लोकनियुक्त सरपंच पदी वर्णी लागली आहे.
दरम्यान सौ.प्रीती आनंदराव कामत या देखील या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत.