एम.आय.डी.सी. प्रकल्पास मंजुरी देण्यास शासन सकारात्मक : प्रधान सचिवांना आदेश -विजयसिंह देसाई सरकार
बांबवडे : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्यावतीने सादर केलेल्या एम.आय.डी.सी. च्या प्रकल्पाला पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले. यावेळी त्यांनी सादर प्रकल्पास तत्काळ मंजुरीसाठी प्रधान सचिवांना आदेश दिले आहेत. तशा आशयाचे पत्र त्यांनी सचिवांना दिले आहे. अशी माहिती तालुकाप्रमुख विजयसिंह देसाई सरकार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

विजयसिंह देसाई सरकार यांनी शाहुवाडी इथं बोलावलेल्या पत्रकार परिषदेत हि माहिती दिली.

दि. ६ जानेवारी रोजी पत्रकारांशी बोलताना त्यांनी या एम.आय.डी.सी. करण्यासंदर्भात प्रयत्न करू, असे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे.
यावेळी विजयसिंह देसाई पुढे म्हणाले कि, आपला तालुका डोंगराळ आहे. तसेच इतिहास संपन्न आहे. निसर्गाने या तालुक्यावर मुक्त हस्ते नैसर्गिक संपत्ती ची उधळण केली आहे. त्यामुळे इथं वेगवेगळ्या प्रकल्पांना लागणारा कच्चा माल मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.

त्यामध्ये बॉक्साईट उत्खनन करण्यासाठी शासनाने पुन्हा परवानगी दिली आहे. बॉक्साईट हे सुद्धा कच्चा माल आहे. इथं जंगलात वन उत्पादन मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच फळांवर प्रक्रिया करण्यासाठी फळफळावळ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे.इथं इथेनॉल निर्मिती करण्यास पोषक वातावरण आहे.त्यामुळे इथं वेगवेगळे उद्योग येण्यास काही हरकत नाही.
या तालुक्यातील सुमारे २५ ते ३० हजार तरुण नोकरी धंद्यानिमित्त पुणे, मुंबई सारख्या शहरात वास्तव्य करीत आहेत. तसेच अनेक बेरोजगार आजही तालुक्यात आहेत. यांना नोकरी अथवा व्यवसाय करता यावा, यासाठी या एम.आय,डी.सी ची निर्मिती गरजेची आहे.

त्याच अनुषंगाने एम.आय.डी.सी. प्रस्ताव मार्गस्थ होत आहे. लवकरच याचे मूर्त स्वरुपात रुपांतर होईल. यासाठी खासदार धैर्यशील माने, पालकमंत्री दीपक केसरकर यांचे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरु आहेत, असेही विजयसिंह देसाई सरकार तालुकाप्रमुख यांनी पत्रकारांशी बोलताना हि माहिती दिली.

यावेळी सुरभी संस्थेचे गिरी सर, आनंद भोसले तालुका उपप्रमुख, तुकाराम चौगुले वाहतूक सेना प्रमुख, अमोल पाटील युवासेना प्रमुख, खडके गुरुजी आदी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची मंडळी यावेळी उपस्थित होती. तसेच पक्षाचे मिडीयाप्रमुख राजाराम कांबळे यांनी आभार मानले.