बांबवडे च्या उपसरपंच निवड प्रक्रियेत श्री ;स्वप्नील घोडे-पाटील यांची बिनविरोध निवड : उत्साहातूनच घोड्यावरून मिरवणूक
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यात दि.१२ जानेवारी रोजी झालेल्या उपसरपंच निवडीत बांबवडे गावची उपसरपंच निवड देखील संपन्न झाली. या प्रक्रियेत स्व.अशोकराव घोडे-पाटील यांचे चिरंजीव श्री स्वप्नील घोडे-पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

या निवड प्रक्रियेत लोकनियुक्त सरपंच श्री भगतसिंग चौगुले यांच्यासहित ११ सदस्य देखील उपस्थित होते. यामध्ये सर्वश्री सुरेश नारकर, विद्यानंद यादव, दीपक निकम, दिग्विजय पाटील, सौ. मनीषा दीपक पाटील, सुनिता विजय कांबळे, सीमा शरद निकम, शोभा संभाजी निकम, वंदना बाजीराव बंडगर, कविता मुकुंद प्रभावळे हे सदस्य उपस्थित होते.

या निवडीनंतर उपसरपंच स्वप्नील घोडे-पाटील यांची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. हि गोष्ट संपूर्ण तालुक्यात नाविन्यपूर्ण घडली आहे. या निवडणुकीचे वैशिष्ठ्य म्हणजे या निवडणुकीत महादेव ग्रामविकास आघाडीने सर्वच्या सर्व जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांचा उत्साह मोठ्या प्रमाणावर होता. या उत्साहातूनच उपसरपंच यांची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली.

यांच्यासोबत ग्रामसेवक आर.बी.कुरणे, त्यासोबत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून के.ए.पाटील, डी.एस. कांबळे यांनी काम पहिले.
यावेळी दीपक पाटील, प्रकाश निकम आदी कर्मचारी वृंद उपस्थित होते.